Mix Veg Paratha  esakal
लाइफस्टाइल

Mix Veg Paratha : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा मिक्स व्हेज पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

नाश्त्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायला सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला काहीतरी पौष्टिक आणि टेस्टी खायचे असेल तर मिक्स व्हेज पराठा हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Mix Veg Paratha : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय खावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीचा नाश्ता जसे की, उपमा, पोहे आणि इडली हे रोज खाऊन अनेकांना बोअर होत. नाश्त्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायला सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला काहीतरी पौष्टिक आणि टेस्टी खायचे असेल, तर मिक्स व्हेज पराठा हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

मिक्स व्हेज पराठा हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीला तितकाच चविष्ट आहे. शिवाय, हिवाळ्यात खाण्यासाठी हा पर्याय एकदम बेस्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात मिक्स व्हेज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

मिक्स व्हेज पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ कप गव्हाचे पीठ

  • १ कप मिक्स भाज्या (गाजर, वाटाणा, कोबी, शिमला मिरची)

  • अर्धा चमचा लाल तिखट

  • अर्धा चमचा गरम मसाला

  • पाणी (गरजेनुसार)

  • तूप किंवा तेल

  • चवीनुसार मीठ

मिक्स व्हेज पराठा बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये गाजर, वाटाणा, कोबी आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या.

  • आता एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, मीठ, तिखट, गरम मसाला, १ चमचा तेल आणि मिक्स भाज्या मिसळा.

  • आता या सर्व मिश्रणात पाणी मिसळून पीठ चांगले मळून घ्या.

  • गॅसवर आता एक पॅन गरम करायला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला पीठाचे गोळे बनवून घ्या.

  • आता तवा किंवा पॅन गरम झाल्यावर पराठे लाटून घ्या आणि तूप किंवा तेलाचा वापर करून भाजून घ्या.

  • पराठ्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावा आणि पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यानंतर, पुदिना चटणी, टोमॅटो सॉस किंवा लोणच्यासोबत गरमागरम पराठा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT