Winter Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेसाठी फायदेशीर आहे केसर-कोकोनट ऑईल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत आणि फायदे

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी केसर कोकोनट ऑईल फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेला तडे जाणे किंवा त्वचा फुटणे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी समस्या निर्माण होतात. वातावरणातील थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेतील ओलावा नाहीसा होता. त्यामुळे, त्वचेला मॉईश्चराईझ करणे महत्वाचे ठरते.

या परिस्थितीमध्ये मग त्वचेवर आपण मॉईश्चरायझिंग क्रीम किंवा लोशनचा वापर करतो. मात्र, यामुळे, त्वचेला तात्पुरता फायदा होता, काही वेळानंतर त्वचेवरील त्याचा प्रभाव कमी होतो.

जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्हाला या समस्येचा जास्त सामना करावा लागत असेल तर त्यावर केसर कोकोनट ऑईल रामबाण घरगुती उपाय आहे.

हे केसर-कोकोनट ऑईल तयार करण्याची पद्धत आणि त्याचे त्वचेला होणारे फायदे आज आपण जाणून घेऊयात.

केसर-कोकोनट ऑईल 'या' पद्धतीने बनवा

केसर आणि नारळाचे तेल बनवण्यासाठी एका वाटीत किंवा बाऊलमधये खोबरेल तेल घ्या. आता त्यामध्ये चिमूटभर केसर मिसळा. आता हे मिश्रण गरम करायला ठेवा. हे तेल चांगले गरम झाल्यानंतर थंड व्हायला ठेवा. नंतर, एका काचेच्या डब्यामध्ये काढून ठेवा.

थंडीमध्ये हे तेल आपोआप गोठते. हे तेल गोठल्यानंतर रोज झोपताना हे तेल चेहऱ्यावर आणि हातापायांवर लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या तेलामुळे, तुम्हाला छान मॉईश्चर ही मिळेल आणि त्वचा सॉफ्ट होण्यास मदत होईल.

केसर-कोकोनट ऑईलचे फायदे

कोरड्या त्वचेसाठी लाभदायी

कोरड्या त्वचेसाठी हे केसर कोकोनट ऑईल अतिशय लाभदायी आहे. हे तेल तुम्ही अगदी डोळे बंद करून त्वचेसाठी वापरू शकता. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे ऑईल अतिशय फायदेशीर आहे. फक्त याचा नियमित वापर करा. त्वचेला योग्य मॉईश्चर देऊन त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम हे तेल करते.

प्रभावी मॉईश्चरायझर

केसर कोकोनट ऑईल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे एक उत्तम मॉईश्चरायझर म्हणून आपल्या त्वचेवर काम करते. हे तेल लावल्याने त्वचा आतून छान हायड्रेटेड राहते आणि त्वचेतील ओलावा लॉक करते. त्यामुळे, त्वचा कोरडी पडत नाही. केसर कोकोनट तेलामुळे त्वचेचे टोनिंग चांगल्या प्रकारे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT