Healthy Breakfast Recipe esakal
लाइफस्टाइल

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा कोबीचा पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

पोहे, शिरा आणि उपमा खाऊन आधीच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी चविष्ट आणि हेल्दी ट्राय करावे,असे प्रत्येकाला वाटते.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पोहे, शिरा आणि उपमा खाऊन आधीच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी चविष्ट आणि हेल्दी ट्राय करावे,असे प्रत्येकाला वाटते.

हिवाळ्यात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी तुम्ही पराठा नक्कीच ट्राय करू शकता. आजकाल पराठ्यामध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यापैकी, बटाटा आणि कांद्याचा पराठा तुम्ही नेहमीच खात असाल.

आज मात्र, आम्ही तुम्हाला कोबीच्या पराठ्याबद्दल सांगणार आहोत. हिवाळ्यात हा गरमागरम कोबीचा पराठा नाश्त्यामध्ये सर्व्ह केल्यास नाश्त्याची मजा आणखी खुलते. आज आपण हा कोबीचा पराठा कसा बनवायचा? त्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

कोबीचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ कप कोबी किसून घेतलेला

  • २ कप गव्हाचे पीठ

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • १ चमचा आल्याची पेस्ट

  • ४-५ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

  • १ चमचा लिंबाचा रस

  • चवीनुसार मीठ

  • तेल

  • बटर

कोबीचा पराठा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ चाळून घ्या.

  • त्यात, थोडे पाणी मिसळून पीठ चांगले मळून घ्या.

  • आता या पीठात किसलेला कोबी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस घाला.

  • हे सर्व मिश्रण घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या.

  • त्यानंतर, १५ मिनिटे हे पीठ झाकून ठेवा.

  • त्यानंतर, या पीठाचे छोटे गोळे बनवून घ्या.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि पराठे लाटून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी पराठा खरपूस भाजून घ्या.

  • त्यानंतर, हा गरमागरम कोबी पराठा दही, चटणी, टोमॅटो सॉस किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT