Healthy Breakfast Recipe esakal
लाइफस्टाइल

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा मुळ्याचा पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाण्यासाठी गरमागरम मुळ्याचा पराठा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये हिरवी चटणी, सॉस किंवा दह्यासोबत खाण्यासाठी गरमागरम मुळ्याचा पराठा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. या दिवसांमध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या येतात. ज्यामध्ये गाजर, मूळा, काकडी, वाटाणा आणि इतर पालेभाज्यांचा समावेश असतो.

गाजराचा, बटाट्याचा, मेथीचा, कोबीचा इतर प्रकारचे पराठे आपण नेहमीच खातो. मात्र, मुळ्याचा पराठा खाण्याची मजा काही औरच आहे. आज आपण मुळ्याचा पराठा कसा बनवायचा? त्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. हे पराठे तुम्ही नाश्त्यामध्ये देखील खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता.

मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • गव्हाचे पीठ ४ कप

  • २ मूळे बारीक किसून घेतलेले

  • आले लसणाची पेस्ट

  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

  • चवीनुसार मीठ

  • जीरा पावडर

  • लाल तिखट

  • ओवा

  • ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • तेल किंव तूप

मुळ्याचा पराठा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोड तेल आणि मीठ मिसळून चांगली कणीक मळून घ्या.

  • ही कणीक मऊ मळा. जास्त पाण्याचा वापर करू नका.

  • आता दुसऱ्या बाजूला किसलेल्या मूळा चांगला पिळून घ्या. कारण, या मुळ्याला पाणी जास्त सुटते. त्यामुळे, मुळ्यातील पाणी चांगले पिळून ते एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

  • या मुळ्यामध्ये स्टफिंगसाठी बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, जिरेपूड, तिखट, मीठ, ओवा, आले-लसणाची पेस्ट आणि मीठ घाला.

  • हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुमचे पराठ्यासाठीचे स्टफिंग तयार आहे.

  • आता गव्हाच्या पीठाचे बारीक गोळे बनवा. हे गोळे लाटून यामध्ये मुळ्याचे स्टफिंग भरा.

  • स्टफिंग भरल्यानंतर आता तुमचे मुळ्याचे पराठे लाटून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅन गरम करायला ठेवा आणि गरमागरम पराठे भाजून घ्या.

  • यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूपाचा वापर करू शकता.

  • पुदिन्याची हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो सॉससोबत हे मुळ्याचे पराठे खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

SCROLL FOR NEXT