Tirupati laddu Recipe Sakal
लाइफस्टाइल

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Tirupati Laddu Recipe: ज्याप्रामाणे आपण तुळशीचे पान प्रसादावर ठेवतो त्याचप्रमाणे दक्षिण भारतात प्रसादावर कापूर टाकतात.

Puja Bonkile

Tirupati Laddu Recipe: दक्षिण भारतातील सर्व मंदिर भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. पण तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. देश-विदेशातील नागरिक येथे भेट देण्यास येतात. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. तसेच अनेक लोक येथे केस दान करतात. तर अनेक लोकांना येथील खास लाडू आवडतो. अनेक लोक जेव्हा कोणी तिरूपतीला जातील तेव्हा तेथील खास लाडू आणण्यास सांगतात. ज्याप्रामाणे आपण तुळशीचे पान प्रसादावर ठेवतो त्याचप्रमाणे दक्षिण भारतात प्रसादावर खाण्याचा कापूर टाकतात. यामुळे या लाडूला विशिष्ट चव येते. तुम्हाला हा लाडू घरी बनवून पाहायचा असेल तर पुढील पद्धतीनुसार बनवू शकता. हा लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे हे जाणून घेऊया.

तिरूपती लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ वाटी चणा डाळ

१ वाटी साखर

केसर दूधात भिजवलेले

१ वाटी तूप

खडीसाखर

१ वाटी दूध

काजू, बदाम- तुपात भाजलेले

पसादाचा कापूर

टिप: १ वाटी चणा डाळ ४ ते ५ तास दूधात भिजत ठेवावी.

तिरूपती लाडू बनवण्याची कृती

तिरूपती लाडू बनवण्यासाठी भिजत ठेवलेली चणा डाळ नंर मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावी.

नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करावे .

नंतर भिजत ठेवलेली चणा डाळ टाकावी आणि घट्ट होईपर्यंत मिक्स करावे.

नंतर दूध टाका.

यानंतर साखर टाका आणि चांगले मिक्स करावे.

नंतर केशर दूध टाका आणि गॅस बंद करा.

हे मिश्रण थंड करायला ठेवावे.

नंतर त्यात काजू, बदाम, मनुके, खडीसाखर आणि कापूर टाकावे.

सारण हाताने चांगले मिक्स करावे आणि लाडू बनवावा.

टिप: आदल्यादिवशी लाडूचे मिश्रण तयार करून ठेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT