Breakfast Recipe Esakal
लाइफस्टाइल

Breakfast Recipe : नाश्त्यासाठी बनवा चविष्ट दलिया, टेस्ट सोबत मिळेल पोषण! हीआहे सोपी रेसिपी

व्हेजिटेबल दलियामध्ये फॅटचे प्रमाण आणि कोलेस्ट्रोलची पातळी कमी असल्याने ही डिश खूपच पौष्टिक मानली जाते.

Aishwarya Musale

सकाळी उठल्या बरोबर भूक लागलेली आसते. पण ऑफीसचे डबे, जेवण, चहा, नाश्ता या सगळ्या गडबडीत नाश्ता काय बनवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारा गव्हाचा दलिया खाऊ शकतात.

बाजारात अर्धवट दळलेले गहू मिळतात. याला आपण दलियाही म्हणतो. या दलियाची दूध आणि गूळ घातलेली खीर आपल्याला माहित आहे. पण सकाळी सकाळी गोड नको वाटते त्यामुळे भाज्या घालून उपम्यासारखा दलिया केल्यास पोट भरते.

लागणारे साहित्य

  • दलिया १ वाटी

  • १ गाजर बारीक चिरलेलं

  • १०-१५ मटार दाणे

  • शिमला मिरची १

  • कांदा १

  • घेवडा ३-४

  • धने-जीरे पूड

  • मीठ

  • मसाला

कृती

भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. दलिया कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवून घ्यावे. फोडणीत कडीपत्ता, बारीक चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढून घ्यावी. त्यामध्ये दलिया घालून आवडीनुसार तिखट, मसाला, धनेजीरे पावडर, मीठ घालावे. पुन्हा व्यवस्थित वाफ आणून शेवटी वरुन कोथिंबीर घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Wari Accident : जेजुरी अपघातातील जखमी वारकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडून विचारपूस, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

'तू मला रडवलंस...' जेनिलिया देशमुखने राम कपूर संदर्भात व्यक्त होत म्हणाली...

Vinayak Raut Case: शारीरिक छळ अन् मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अघोरी उपचार; राऊत कुटुंबियांविरोधात सुनेची तक्रार

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Instagram यूजर्ससाठी धोक्याची घंटा! 'ही' सेटिंग बंद न केल्यास Meta AI वापरू शकतो तुमचे पर्सनल फोटो, कसं बंद करायचं पाहा

SCROLL FOR NEXT