लाइफस्टाइल

Tips and Tricks: काळ्या जिन्सचा रंग उडालाय? घरच्या घरीच परत आणा नव्यासारखी चमक, जाणून घ्या

Aishwarya Musale

आजच्या काळात सुंदर सुंदर कपडे आपल्याला परिधान करायाला मिळतात. बाजारात विविध प्रकारच्या फॅशनचे कपडे उपलब्ध आहे. त्यामुळे लोक नवनवीन फॅशनचे कपडे परिधान करून प्रयोग करतात. मुलींना तर कितीही कपडे असले तरी कमीच पडतात. पण मुलगा असो वा मुलगी, पटकन कुठेही जायचं असेल किंवा सर्वात आरामदायी कपडे म्हटलं की सध्या प्रत्येकजण जीन्सचा वापर करतात.

आज काल फ्लेक्झिबल जीन्स बाजारात आल्या आहेत त्यामुळे हालचाल करणे सोपे होते. जीन्समध्येही आता विविध रंगाचे पर्याय उपलब्ध असतात पण यामध्ये काळ्या रंगाची जीन्सला सर्वांची पसंती जास्त असते. पण ती जीन्स धुवायची म्हणलं की नको वाटतं, कारण त्या जीन्सचा रंग जातो.

कारण जितक्या वेळा तुम्ही ती धुवाल तितका रंग फिकट होईल. याच कारणामुळे काळ्या जीन्सचा रंग खूप लवकर फिका पडतो. प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये काळ्या जीन्सची किमान एक जोडी असते.

तुम्ही रोज काळी जीन्स घालणे देखील टाळता, कारण ती घाण झाली तर तुम्हाला ती पुन्हा धुवावी लागेल. या जीन्स कोणत्याही रंगाच्या टॉप, टी-शर्ट किंवा शर्टच्या खाली छान दिसतात.

काळा रंग प्रत्येकाला आवडतो मग तो मुलगा असो वा मुलगी. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही काळ्या जीन्सला घरच्या घरी नवीन सारखे बनवू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास लागेल.

अशा प्रकारे तुम्ही काळ्या जीन्सचा पुन्हा वापर करू शकता

  • प्रथम तुम्हाला ब्लॅक डाय कलर विकत घ्यावा लागेल.

  • रबर ग्लोव्ह्स

  • एक टब

  • मीठ

  • वुडन स्पून

  • लिक्विड डिटर्जेंट

जीन्स नवीन कशी बनवायची

यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करावे, नंतर एका मोठ्या टबमध्ये डाय कलर मिक्स करावे.

हे सर्व करताना हाताला ग्लोव्हज घालावेत आणि अंगावर फक्त खराब कपडे घालावेत हे लक्षात ठेवा. अन्यथा, तुमच्या कपड्यांवर काळे डाग दिसू शकतात.

आता त्यात अर्धा चमचा मीठ घालून लाकडाच्या साहाय्याने चांगले मिसळा.

यानंतर तुम्हाला त्यात जीन्स भिजवावी लागेल.

नंतर लाकडाच्या साहाय्याने जीन्सला हळू हळू फिरवत रहा. जेणेकरून रंग संपूर्ण जीन्सवर समान रीतीने पसरेल.

सुमारे 30 मिनिटांनंतर पाण्यातून जीन्स काढावी लागेल. तुम्ही 45 मिनिटे देखील ठेऊ शकता. असे केल्याने जीन्सवर रंग चांगला येईल.

मग तुम्ही ते चांगले पिळून घ्या.

आता तुम्हाला जीन्स थंड पाण्याने धुवावी लागेल. यासाठी एका टबमध्ये थंड पाणी आणि डिटर्जंट मिसळा. नंतर ते चांगले पिळून घ्या जेणेकरून शक्य तितके जास्तीचे पाणी काढून टाकले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT