Home Decor Idea:  Sakal
लाइफस्टाइल

Home Decor Idea: छोट्या खोलीला 'अशा' प्रकारे सजवा, घराला मिळेल सुंदर लूक

Home Decor Idea: घरातील प्रत्येक सामान नीट आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास घर अधिक आकर्षक दिसते

Puja Bonkile

Home Decor Idea: घर छोटे असो किंवा मोठे सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सामान नीट ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छता करूनही घरात वस्तू विखुरलेल्या असतील तर घर अस्वच्छ दिसते. पण घर लहान असले तरी घरातील वस्तू नीट ठेवणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येक सामान नीट आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास घर अधिक आकर्षक दिसते. पण यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

वापरात नसलेल्या वस्तू बाहेर काढा

घर सुंदर दिसण्यासाठी सर्वात आधी वापरात नसलेल्या वस्तू घरातून बाहेर काढा. तुम्हाला कधीच कामात न येणाऱ्या वस्तू काढून टाकल्यास तेवढी जागा मोकळी होईल. यामुळे स्वच्छता करणे देखील सोपे होणार.

योग्य फर्निचरची निवडा

तुम्ही घरासाठी फर्निचर खरेदी करत असाल तर खोलीचा आकार लक्षात घ्यावा. छोटी किंवा मोठी खोली असेल तर त्यामुसार फर्निचर करावे. योग्य फर्निचरची निवड केल्यास घर आकर्षक दिसेल. आजाकाल बाजारात अनेक प्रकारचे फर्निचर मिळतात. तुम्ही गरजेनुसार फोल्ड करून देखील ठेऊ शकता.

कपाटाचा वापर करावा

घरातील वस्तू योग्य ठेवण्यासाठी कपाटाचा वापर करू शकता. यामुळे घर नीट आणि स्वच्छ दिसेलच पण तुम्हाला वस्तूंची शोधाशोध करावी लागणार नाही. तसेच खोलीत वस्तू विखुरलेल्या दिसणार नाही. स्वयंपाक घरातील वस्तू ठेवण्यासाठी देखील कपाटाचा वापर करू शकता. कपाटामध्ये ठेवलेल्या वस्तू लवकर दिसतील.

छोट्या वस्तूंसाठी वेगळे स्टॅड किंवा कपाट

छोट्या वस्तू ठेवण्यासाठी छोटे स्टॅड किंवा कपाट वापरू शकता. यामुळे खोलीत वस्तू विखुरलेल्या दिसणार नाहीत. आजकाल बाजारात छोट्या वस्तू ठेवण्यासाठी छोट्या रॅक मिळतात. यामुळे कमी जागेत जास्त वस्तू ठेऊ शकता. रिमोट, चाव्या यासारख्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हॅन्गर आणि रिमोट स्टॅडचा वापर करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातील अकोला का ठरतंय देशातील ‘हॉट सिटी’, हवामान तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण..

Sawantwadi Bribery Case : सावंतवाडीत ACB ची धडाकेबाज कारवाई; 10 हजारांची लाच घेताना भूमापकाला रंगेहात पकडले, जमीन मोजणीसाठी मागत होता पैसे

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरण : निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता

Pune News: पुण्यात १३ प्रभाग समित्या बिनविरोध; दोन जागांसाठी भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार

Pune News: पुण्यात ‘सुखोई’चा अपघात; धावपट्टीवर आग; पन्नास विमानांची उड्डाणे रद्द

SCROLL FOR NEXT