How To Polish Artificial Jewellery And Restore Shine At Home  
लाइफस्टाइल

Artificial Jewellery: 'या' सुपर ट्रिक्स वापरुन स्वच्छ करा तुमची आर्टिफिशियल ज्वेलरी; खऱ्या अन् नकली मध्ये फरकही कळणार नाही

आर्टिफिशियल ज्वेलरीची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास त्यांची चकाकी कायम राहून त्या वर्षांनुवर्षे चांगल्या टिकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या घडीला खरं दागिणे खिशाला परवडणारे नाहीत. सोन्या चांदीचा भाव गगनाला भिडलाय. त्यामुळे लग्न असो वा घरातील कोणताही कार्यक्रम सर्रास आर्टिफिशियल ज्वेलरी वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. आजकाल बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स सहज उपलब्ध होतात.

नेकलेस, झुमके, बांगडया, अंगठ्या, बाजूबंद असंख्य दागिण्यांचे प्रकार आपण पाहत आहोत आणि वापरतोदेखील. आर्टिफिशियल ज्वेलरी कॅरी करायला हलक्या व रेडी टू वेअर असतात. त्यामुळे आपण हौसेने कार्यक्रमांदरम्यान खरेदी करतो.

पण हे दागिणे काही रोज घातले जात नाहीत. त्यामुळे कपाटात ठेवुन देतो. पण ठेवल्यामुळं हे दागिने काळं पडल्याचे निर्दशनास येते. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तर आज आम्ही काही सुपर ट्रिक्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळं काही मिनिटातंच तुमचे दागिणे तुम्हीच ओळखणार नाही.

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतोच. अर्धा कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या दागिन्यांवर लावा आणि मऊ टूथब्रशने स्क्रब करा. हलके स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

व्हिनेगर आणि मीठ

आर्टिफिशियल दागिने स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला व्हिनेगरसह मीठ आवश्यक असेल. एक कप गरम पाण्यात एक चमचा व्हिनेगर आणि थोडे मीठ मिसळा. त्यानंतर या मिश्रणामध्ये तुमची ज्वेलरी काही काळ भिजवा. यामुळे घाण आणि काळपटपणा दूर होईल. आता मिश्रणातून दागिने काढून टाकल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून टाका.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाने तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी देखील चमकवू शकता. यासाठी दागिन्यांना लिंबाचा रस लावा आणि 5-10 मिनिटे लावून ठेवा, जेणेकरून रस दागिन्यांच्या पृष्ठभागावर चांगले काम करू शकेल. काही वेळानंतर, मऊ ब्रशच्या मदतीने दागिने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. शेवटी, ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा, मग ते नवीनसारखे चमकू लागेल.

टूथपेस्ट

दागिन्यांवर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशच्या साहाय्याने नीट घासून घ्या. यानंतर, दागिने स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा. तुम्हाला तुमचे दागिने नवीनसारखे दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT