Washing Machine  sakal
लाइफस्टाइल

Washing Machine Use : वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्याने भरमसाठ लाईट बिल येतंय? या टिप्स फॉलो करुन वाचवा पैसे

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ही काळजी.

Aishwarya Musale

वॉशिंग मशिन अनेक दशकांपासून वापरात आहेत, परंतु कालांतराने त्यात अनेक तांत्रिक प्रगती दिसून येत आहेत. पूर्वी ते मॅन्युअल असायचे, पण आता ऑटोमॅटिक मशीनचा ट्रेंड वाढला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला कपडे धुण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

अशा स्थितीत वॉशिंग मशिनचे महत्त्व अधिकच वाढते, तुम्हाला फक्त कपडे आणि डिटर्जंट घालून वॉशिंग मोड आणि वॉटर लेव्हल तुमच्या स्वतःनुसार सेट करावे लागेल आणि मग ते चालू करून तुम्ही आरामात बसू शकता.

वीकेंडमध्ये वॉशिंग मशिनमुळे तुमचे अवघड काम सोपे होत असले, तरी महिनाअखेरीस आलेले प्रचंड वीज बिल पाहिल्यावर धक्का बसतो. हे टाळण्यासाठी बरेच लोक काही कपडे हाताने धुण्यास सुरुवात करतात, परंतु आता तुम्हाला इतका त्रास करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा ट्रिक्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता.

1. प्रथम कपडे साठवा, नंतर धुवा

काही लोक वॉशिंग मशिन वापरतात जेव्हा त्यांच्याकडे धुण्यासाठी फक्त 2 ते 3 कपडे असतात, जर तुम्हाला वीज बिल वाचवायचे असेल तर खूप कपडे जमा झाले की वीकेंडलाच कपडे धुवा. मात्र, मशीनमध्ये कपडे ओव्हरलोड होणार नाहीत याची काळजी घ्या.

2. जास्त पाणी वापरू नका

काही लोक वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्यासाठी जास्त पाणी वापरतात, यामुळे पाणी वाया जातं, आणि विजेचा वापरही वाढतो. पाण्याची पातळी एवढ्या प्रमाणात सेट करावी की कपडे व्यवस्थित बुडतील.

3. थंड पाणी वापरा

वॉशिंग मशिन वापरताना गरम पाण्याचा वापर केला तर एनर्जी जास्त युज होईल, ही परिस्थिती टाळण्यासाठी फक्त थंड पाण्यातच कपडे धुवा. ही युक्ती अवलंबल्यास वीज बिल बऱ्यापैकी कमी होईल.

4. क्विक वॉश मोडवर कपडे धुवा

आजकाल बहुतेक वॉशिंग मशिनमध्ये क्विक वॉश मोड असतो, हे बटण दाबले तर कपडे लवकर धुतातच, शिवाय विजेचीही खूप बचत होते. विशेषतः डार्क कपडे या मोडवर धुतले जाऊ शकतात.

5. उन्हाळ्यात स्पिन यूज करू नका

उन्हाळ्याच्या हंगामात, कपडे त्वरीत सुकतात, म्हणून आपल्याला ते वॉशिंग मशीनमध्ये स्पिन करण्याची गरज नाही. विजेची बचत करायची असेल तर उन्हाळ्यात कपडे उन्हात वाळवा.

6. एनर्जी सेविंग मोड ऑन करा

आता अशी अनेक वॉशिंग मशीन बाजारात आली आहेत ज्यात 'एनर्जी सेव्हिंग मोड' आहे, याचा वापर करून तुम्ही विजेची बचत देखील करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 1st Test: पाकिस्तानचा अजब कारभार! बंदी घातलेल्या आफ्रिदीला कसोटी संघात निवडले, ३८ व्या वर्षी पदार्पणाची संधी

Municipal Elections: हिवरखेड नगर परिषदची सूत्रे अकरा महिलांच्या हाती! ईश्वर चिठ्ठ्या निर्णायक; नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

Eggs Health Risks: अंडी खाणे आरोग्यदायी पण 'या' 5 पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका

Naxal IED Blast: नक्षलवाद्यांकडून पुन्हा भ्याड हल्ला! आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर...; जखमींमध्ये आमदारांच्या भावाचाही समावेश

Latest Marathi News Live Update : सोलापुरात रस्त्यावर तलवार फिरवत बड्डे साजरा करणे तरुणांना भोवले

SCROLL FOR NEXT