ration card
ration card google
लाइफस्टाइल

नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डात कसे नोंदवाल ? जाणून घ्या प्रक्रिया...

नमिता धुरी

मुंबई : जर तुमचे लग्न झाले असेल किंवा तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य आला असेल तर त्याचे नाव शिधापत्रिकेवर नोंदवणे आवश्यक आहे. असे न केल्यास नुकसान होऊ शकते. जेथे शिधापत्रिका आवश्यक असते अशा सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. शिधापत्रिकेवर नवीन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे ते जाणून घेऊ या.

शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे ?

तुम्ही विवाहित असाल तर आधी आधार कार्ड अपडेट करा.

महिला सदस्याने पतीचे आडनाव लावायचे ठरवले असल्यास तसा बदल आधार कार्डमध्ये करावा लागेल.

तुमच्या कुटुंबात बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे.

लग्न झाल्यास पत्ताही बदलावा लागेल.

आधार कार्ड अपडेट केल्यानंतर, सुधारित आधार कार्डच्या प्रतीसह, शिधापत्रिकेत नाव जोडण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याला अर्ज द्या.

ऑनलाइन अर्ज करू शकता ?

वर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही कार्यालयात जाऊन अर्ज सादर करा.

याशिवाय तुम्ही घरी बसून नवीन सदस्यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता.

यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

तुमच्या राज्यात सभासदांची नावे ऑनलाइन जोडण्याची सुविधा असेल तर तुम्ही हे काम घरी बसून करू शकता.

वास्तविक, अनेक राज्यांनी त्यांच्या पोर्टलवर ही सुविधा दिली आहे, तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा नाही.

मुलांसाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला मुलाचे नाव जोडायचे असेल तर आधी त्याचे आधार कार्ड बनवावे लागेल.

यासाठी मुलाचा जन्मदाखलाही आवश्यक असेल.

यानंतर, आधार कार्डसह, तुम्ही शिधापत्रिकेत मुलाचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र

INDW vs BANW 5th T20I : भारतीय महिला संघाकडून बांगलादेशला व्हाईट वॉश; पाचव्या सामन्यातही दिली मात

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT