Spectacle Mark: Sakal
लाइफस्टाइल

Spectacle Mark: चष्मा लावल्यामुळे नाकावर डाग पडला असेल तर 'असे' करा स्वच्छ

Spectacle Mark: जे लोक जास्तवेळ चष्मा घालून असतात त्यांच्या नाकावर डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

how to remove Spectacle Mark from nose home remedies

ज्या लोकांना सतत चष्मा घालण्याची सवय असते त्यांच्या नाकावर चष्म्याचे डाग दिसू लागतात. सुरुवातीला हे डाग खूप हलके असतात पण कालांतराने ते गडद होतात. विशेषत: चष्मा काढून ठेवल्यावर नाकाच्या दोन्ही बाजूने हे डाग ठिपक्यांसारखे दिसतात. परंतु, हे डाग कायमस्वरूपी नसतात आणि योग्य उपाय करून पाहिल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते. तुम्ही पुढील घरगुती उपाय करून नाकावर दिसणारे डाग कमी करू शकता.

बटाट्याची पेस्ट

बटाटा ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत. बटाट्याची पेस्ट असो किंवा बटाट्याचा रस, नाकावरील डाग दूर कमी करू शकतो. यासाठी बटाटे बारिक करून त्यात गुलाबजल टाका आणि नाकावर लावावे आणि नंतर धुवावे.

कोरफड जेल

कोरफड जेलचा वापर करून डाग कमी करू शकता. या डागांवर कोरफडीचे जेल लावा आणि १० ते १५ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. तसेच तुम्ही रात्रा झोपताना देखील नाकावर कोरफड जेल लावून झोपू शकता.

काकडीचा रस

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपुर असते. यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेला सुखदायक प्रभावही मिळतो आणि नातावरचे डाग कमी होऊ शकतात. यासाठी काकडीचा रस कापसाच्या साहाय्याने डागांवर लावा आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

लिंबाचा रस

नाकावरचे डाग कमी करण्यासाठी पुदिना बारीक करून त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट 15 ते 20 मिनिटे नाकाच्या डागांवर लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे चष्माचा नाकावरचा डाग कमी होतो.

संत्र्याची साल

संत्र्याची साल उन्हात वाळवा आणि बारीक करून पावडर तयार करा. यानंतर या संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करावी आणि नाकावर लावावी. 20 ते 25 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. ही पेस्ट आठवड्यातून 3 ते 4 वेळा नाकावर लावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT