chicken  sakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवले तरी चिकन लवकर खराब होते का? मग या टिप्स ट्राय करून बघा

चिकन फ्रिजमध्ये जास्त काळ ताजे कसे ठेवता येईल ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

शिजवलेले असो वा कच्चे चिकन, त्याचा ताजेपणा दीर्घकाळ टिकवणे हे मोठे आव्हान असते. कारण ते लवकर खराब होण्याचा धोका नेहमीच असतो. तुम्ही फ्रीज कधी उघडला असेल तर तुम्हाला त्यात उग्र वास जाणवला असेल.

हा वास फ्रीजमध्ये ठेवलेले मांस सडू लागल्याचे लक्षण आहे. चिकन लवकर खराब न होण्यासाठी, ते योग्यरित्या स्टोर करणे फार महत्वाचे आहे. चिकनची क्वालिटी, ते साठवण्याची योग्य पद्धत, फ्रीजचे तापमान इत्यादींची योग्य माहिती तुमच्याकडे असायला हवी. चिकन फ्रिजमध्ये जास्त काळ ताजे कसे ठेवता येईल ते जाणून घेऊया.

कच्चे चिकन कसे स्टोर करायचे ?

फ्रिजमध्ये कच्चे चिकन ठेवण्यापूर्वी, कोमट पाण्यात चिकन काही वेळ भिजत ठेवा. त्यानंतर ते थंड पाण्यात टाका. हे सर्व केल्यानंतर चिकन कोरडे करून फ्रीजमध्ये ठेवा.

दीर्घकाळ ताजे कसे ठेवायचे?

जर तुम्हाला कच्चे चिकन जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर ते हळद आणि मीठ घालून मॅरीनेट करा. नंतर एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हळदीमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध होतो.

कच्चे चिकन न धुता कसे ठेवावे?

जर तुम्हाला चिकन धुण्यास किंवा स्वच्छ करण्यात आळस वाटत असेल तर तुम्ही ते एयरटाइट झिप पाऊचमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

शिजवलेले चिकन

शिजवलेले चिकन 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवता येते. शिजवलेल्या चिकनमध्ये ग्रेव्ही चिकन, रोस्टेड चिकन, ग्रील्ड चिकन, उकडलेले चिकन इत्यादींचा समावेश होतो.

योग्य तापमानात स्टाेर करणे महत्वाचे आहे

चिकन दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी, ते योग्य तापमानात स्टाेर करणे आवश्यक आहे. कारण असे केले नाही तर चिकन खराब करणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढेल. चिकन स्टाेर करण्यासाठी तुम्ही रेफ्रिजरेटरचे तापमान 4.4°C किंवा त्यापेक्षा कमी सेट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT