Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हिवाळ्यात कलर केलेल्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या काळजी

विविध प्रकारच्या हेअर कलरचा वापर करून केस स्टाईल करण्यावर तरूणी भर देत आहेत. त्यामुळे, हिवाळ्यात खास करून कलर केलेल्या केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढली की आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये खास करून सर्दी, खोकला आणि तापाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.

परंतु, हिवाळ्यात आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतात. या समस्या दूर करण्यासाठी केसांची आणि त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. महिलांमध्ये आणि खास करून तरूणींमध्ये हेअर कलर करून घेण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

विविध प्रकारच्या हेअर कलरचा वापर करून केस स्टाईल करण्यावर तरूणी भर देत आहेत. त्यामुळे, हिवाळ्यात खास करून कलर केलेल्या केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण हिवाळ्यात कलर केलेल्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी काळजी कशी घ्यायची? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

या पद्धतीने धुवा केस

कलर केलेले केस धुण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करा. चुकूनही गरम पाण्याने केस धुवू नका. जर तुम्ही कलर केलेले केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला तर तुमच्या केसांचा कलर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गरम पाण्यामुळे केस खराब होतात आणि कलर केलेले केस कोरडे पडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे, कलर केलेले केस धुण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करायला विसरू नका.

हेअर स्टायलिंग टूल्सचा करू नका वापर

कलर केलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही केसांवर स्टायलिंग टूल्सचा वापर करणे टाळायला हवे. त्यामुळे, शक्यतो हेअर स्टायलिंग टूल्सचा केसांवर वापर कमी करा. अन्यथा तुमचे कलर केलेले केस खराब होण्याची दाट शक्यता आहे.

जर तुम्हाला हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर करावा लागला तर केस स्टाईल करण्यापूर्वी आधी केसांवर कलर प्रोटेक्ट सीरमचा वापर करायला विसरू नका. अन्यथा केसांचा कलर उडेल आणि केस खराब होतील.

लिव इन कंडिशनरचा करा वापर

हिवाळ्यात कलर केलेल्या केसांची खास काळजी घेण्यासाठी तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये लिव इन कंडिशनरचा वापर करायला विसरू नका. खास करून जर तुम्ही रिबॉंडिंग आणि कर्ल्स सारख्या स्टाईल्स केसांवर करणार असाल तर त्यापूर्वी कलर केलेल्या केसांवर लिव इन कंडिशनरचा वापर करा.

लिव इन कंडिशनरमुळे, केस तुटण्यापासून केसांचा बचाव होईल आणि केसांचा कलर देखील बरेच दिवस टिकण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT