Curly Hair Tips  sakal
लाइफस्टाइल

Curly Hair Care Tips : कुरळ्या केसांची अशी काळजी घ्याल तर कसे होतील चमकदार, घनदाट व काळेभोर

Curly Hair Tips : कुरळ्या केसांची निगा राखणे अतिशय कठीण असते. घरच्या घरी कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

सकाळ डिजिटल टीम

Curly Hair Care Tips: कुरळे केस दिसायला छान दिसतात, पण त्यांची काळजी घेणं खूप अवघड असते. कुरळ्या केसांची काळजी घेण्याचा कंटाळा येतो, म्हणून बहुतांश जणी केस स्ट्रेट करून घेण्याचा विचार करतात.

पण केसांचा पोत खराब होईल या भीतीने ही कृती टाळतातही. काहींना वेळेअभावी केसांची काळजी घेणे शक्य होत नाही. यामुळे केस तुटतात किंवा गळतात. तुम्ही देखील याच समस्यांचा सामना करत आहात का? तर मग चिंता करू नका. या लेखाद्वारे आपण काही साध्या पण उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत.

कुरळ्या केसांसाठी योग्य प्रोडक्ट्स

कुरळ्या केसांसाठी योग्य प्रोडक्ट्सची निवड करणे गरजेचं आहे. यासाठी एखादे महागडेच प्रोडक्ट खरेदी करावे, असा काही नियम नाही. पण केसांचे आरोग्य निरोगी राहावे, केस कुरळे आणि चमकदार दिसावेत तसंच केसांचे तुटणे व गळणे यासारख्या समस्या कमी होण्यासाठी योग्यरित्या हेअर केअर रूटीन फॉलो करणं गरजेचं आहे.

जर तुमचे केस कोरडे झाले असतील तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य वेळेतच हेअर केअर प्रोडक्ट बदलावे आणि केसांची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे. 

अशी करा शॅम्पूची निवड

बहुतांश तरुणींना सरळ केसांऐवजी कुरळेच केस आवडतात. कारण यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अधिक भर पडते. पण केसांची योग्य निगा न केल्यास केसांशी संबंधित कित्येक समस्या उद्भवू शकतात.

केसांच्या सर्व समस्यांतून मुक्तता हवी असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळ शॅम्पूने केस नक्की स्वच्छ धुवावेत. कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी ट्राय मॉइश्चराइझर, सल्फेट फ्री, शिया बटर आणि ग्लिसरीन यासारख्या घटकांचा समावेश असलेल्या शॅम्पूची निवड करावी. 

कंडिशनर नक्की वापरावे   

केस शॅम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर कंडिशनर लावायला मुळीच विसरू नये. कारण हेअर केअर रूटीनमधील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. कंडिशनरमुळे कुरळ्या केसांना मॉइश्चराइझर मिळते, ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या निर्माण होत नाही.  

हेअर मास्कचा वापर करावा

दर 15 दिवसांनी एकदा हेअर मास्कचा वापर नक्की करावा. यामुळे कुरळ्या केसांवरील चमक वाढेल शिवाय केस मऊ देखील राहतील. आपण हीटिंग टुल्स उदाहरणार्थ ड्रायर, स्ट्रेटनरचा अधिक वापर करत असाल तर केसांना हेअर मास्क लावणे अतिशय गरजेचं आहे. यामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT