फुलवा मोगरा Eaksl
लाइफस्टाइल

Home Garden तुमचं मोगऱ्याचं रोपही सुगंधीत फुलांनी बहरेल, फॉलो करा या टिप्स

कोणत्याही रोपांसाठी देखील मेंटेनंस हा खूप गरजेचा आहे. रोप लावल्यानंतर त्याला पाणी देण्यासोबत इतर अनेक प्रकारे त्याची काळजी घ्यावी लागते. योग्य प्रकारे काळजी घेतली तर रोपांना कायम भरपूर फूल येतात

Kirti Wadkar

घरामध्ये विविध प्रकारची रोपं लावणं अनेकांना आवडतं. सुगंधित फुलांमध्ये Flowers मोगऱ्याचं रोप अनेकजण लावणं पसंत करतात. पांढऱंशुभ्र दिसणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला शांती देतो. How to take care of Mogara Flower in your home

घरात किंवा अंगणात मोगऱ्याचं रोप लावल्याच फुलांमुळे सभोवताली सुगंध दरवळतो. मोगऱ्याचं रोप जमिनीत लावण्यासोबत एखाद्या मोठ्या कुंडीतही लावता येतं. अनेकजण मोठ्या आवडीने मोगऱ्याचं रोप Sapling लावतात. सुरुवातीला या रोपाला असंख्य फुलं येतात.

मात्र अनेकदा कालांतराने रोपाला फुलं Flowers येणं कमी होतं. रोपावर अगदी ३-४ मोजकीच फुलं दिसू लागतात. आपलं मोगऱ्याचं रोप फुलांनी बहरून जावं असं तुम्हालाही वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.

कोणत्याही रोपांसाठी देखील मेंटेनंस हा खूप गरजेचा आहे. रोप लावल्यानंतर त्याला पाणी देण्यासोबत इतर अनेक प्रकारे त्याची काळजी घ्यावी लागते. योग्य प्रकारे काळजी घेतली तर रोपांना कायम भरपूर फूल येतात.

मोगऱ्याचं लोप लावताना घ्यायची काळजी

मोगऱ्याच्या रोपाची मुळं ही जमिनीत खोलवर जातात. यासाठीच जर तुम्ही कुंडीमध्ये मोगऱ्याचं रोप लावत असाल तर कुंडी मोठी असेल याची काळजी घ्या. रोपासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीचा वापर करा.

यासाठी तुम्ही मातीमध्ये थोडी वाळू तसचं थोडं शेणखत मिसळून रोप लावू शकता. मोगऱ्याच्या रोपांना सुर्यप्रकारशाची आवश्यकता असल्याने दिवसातील किमान ५-६ तास सुर्यप्रकारश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा.

हे देखिल वाचा-

मोगऱ्याच्या रोपांची छाटणी

मोगऱ्याचं रोप लावल्यानंतर त्याची वेळोवेळी कटिंग म्हणजेच छाटणी करणं गरजेचं आहे. साधारण मार्च महिन्यापूर्वीच मोगऱ्याच्या रोपाचं प्रूनिंग म्हणजेच छाटणी करावी. जर मार्चमध्ये छाटणी करणं राहून गेलं असेल तर तुम्ही फूलं येऊन गेल्यानंतरही कटिंग करू शकता.

यासाठी कायम रोपाच्या वरच्या बाजूला असलेल्या फांद्या कापाव्या. छाटणीमुळे रोप अधिक चांगलं बहरतं आणि रोपाला असंख्य फूलं येतात.

मोगऱ्याच्या रोपावर किडरोगाचा प्रादूर्भाव झाल्यास

अनेकदा मोगऱ्याच्या रोपावर किडरोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. खास करून स्पायडर माइट्सचा मोगऱ्यावर प्रादूर्भाव होत असतो. यामुळे पानांवर पांढरे डाग दिसू लागतात. कालांतराने पानं पिवळी पडू लागतात. रोपाला फूलं येत नाही आणि रोपाची वाढ खुंटते.

मोगऱ्यावरील किड दूर करण्यासाठी तुम्हाला फंगीसाइड आणि पेस्टिसाइडचा वापर करावा लागेल. यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. तसचं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किडीचं प्रमाण कमी असल्यास रोपाच्या मुळांपाशी राख टाकावी.

दर दोन महिन्यांची खत देणं गरजेचं

मोगऱ्याच्या रोपाला असंख्य फूलं यावी अशी तुमची इच्छा असेल तर रोपाला दर दोन महिन्यांनी खत देणं गरजेंचं आहे. मोगऱ्याच्या रोपाला फॉस्फरस, झिंक आणि कॅल्शियम असेलं खत देणं गरजेचं आहे. बाजारामध्ये केवळ मोगऱ्याच्या रोपासाठी वेगळं खत सहज उपलब्ध होतं.

खत टाकताना कायम रोपाच्या मुळाजवळील माती थोडी खोदावी. त्यानंतरच खात टाकावं. खत टाकल्यानंतर थोडं पाणी टाकणं विसरू नका.

फ्वाॅवरिंगच्या वेळी या गोष्टी करणं टाळा

मोगऱ्याच्या रोपाला फूलं येण्याचा काळामध्ये त्याची छाटणी करू नका. कारण या काळामध्ये रोप वाढीच्या अवस्थेत असतं.

फ्लाॅवरिंग झाल्यानंतर पुन्हा नोड्स म्हणजेच गाठींजवळ छाटणी करा.

मोगऱ्याची फूलं तोडताना खास काळजी घेणं गरजेचं आहे. मोगऱ्याची फूलं अनेकदा गुच्छांमध्ये येतात. अशा वेळी संपूर्ण गुच्छ न तोडता केवळ एक एक फूल तोडा.

पावसाळ्याच्या काळामध्ये अधुनमधुन मुळांजवळील माती दूर करून रोप उन्हामध्ये ठेवा ज्यामुळे मुळांना बुरशी पकडणार नाही.

अशा प्रकारे जर तुम्ही मोगऱ्याच्या रोपाची योग्य काळजी घेतली तर रोपाला भरभरून फुलं येतील.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT