Monsoon Safety Tips esakal
लाइफस्टाइल

Monsoon Safety Tips : पावसाळ्यात तुमच्या सुरक्षेची अशी घ्या काळजी, ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो

Monsoon Safety Tips : पावसाळ्यात आपण स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Safety Tips : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात अनेक आव्हानांचा देखील आपल्याला सामना करावा लागतो.

या दिवसांमध्ये वाहतूक अपघातांपासून ते वीज खंडीत होण्यापर्यंत अनेक घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे, या दिवसांमध्ये आपण स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही मान्सून सेफ्टी टिप्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्स.

वाहन चालवताना काळजी घ्या

पावसाळ्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. कारण, या दिवसांमध्ये रस्त्यांवर पाणी साचते, खड्डे पडतात. त्यामुळे, पावसाच्या पाण्यातून गाडी चालवताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास जास्त पावसात प्रवास करणे टाळा. तसेच, पाऊस कमी होण्याची वाट पाहणार असाल तर सुरक्षित ठिकाणी तुमची गाडी थांबवा.

घराबाहेर पडू नका

पावसाळ्यात काही उत्साही नागरिकांना पावसाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटायचा असतो. परंतु, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचे असू शकते. पावसाच्या पाण्यासोबत संपर्कात येण्याचे टाळा. यामुळे, तुम्हाला विविध आजारांचा संसर्ग उद्भवू शकतो. तसेच, एखाद्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस आणि पायाच्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये घराबाहेर पडू नका आणि पावसात भिजू नका.

छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा

पावसाळ्यात घराबाहेर पडताना किंवा तुमच्या वाहनात, तसेच कामाच्या ठिकाणी छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा. जेणेकरून पाऊस आल्यास तुमचे पावसापासून संरक्षण होऊ शकेल. पावसाळ्या तुमच्यासोबत छत्री किंवा रेनकोट सोबत असणे फार आवश्यक आहे. 

कारण, यामुळे तुमचा पावसापासून बचाव तर होईलच, त्यासोबतच तुमचे पाकीट, कार्ड आणि फोन यांसारख्या महत्वाच्या गोष्टींचे पावसात भिजण्यापासून संरक्षण होऊ शकेल. त्यामुळे, या दिवसांमध्ये छत्री आणि रेनकोट अवश्य सोबत ठेवा.

विद्युत धोक्यांबद्दल दक्ष राहा

पावसाचे पाणी आणि वीज यांचा मिलाप असणे हे अजिबात चांगले नाही. हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कारण, पावसाच्या पाण्यात जर चुकून वीज उतरली तर यामुळे व्यक्तीला शॉक बसू शकतो आणि शॉक बसून मृत्यू देखील होऊ शकतो.

त्यामुळे, पावसाळ्यात बाहेर पडल्यावर या विद्युत धोक्यांबद्दल जागरूक राहा. पाऊस पडणार आहे, असे जर तुम्हाला वाटले तर विद्युत उपकरणे, आणि मशिनरी चालवणे लगेच थांबवा आणि पाऊस थांबेपर्यंत वाट पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT