parenting tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आधी पालकांना स्वत:मध्ये त्या सवयी रूजवाव्या लागतील.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : लहान मुलांना आपण जे शिकवतो ते शिकण्याचा मुले प्रयत्न करत असतात. पालक कसे वागतात? आणि कसे बोलतात? हे सुद्धा महत्वाचे आहे. मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार करणे, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचे काम पालक करतात. मात्र, मुले जशी मोठी होतात तसे त्यांना काही चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना त्या सवयींमागचे फायदे आणि महत्व पटवून द्या. या सगळ्याचा मुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो. मुलं जे पाहतात तेच शिकतात असं ही तुम्ही ऐकल असेल आणि हे खरं ही आहे. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आधी पालकांना स्वत:मध्ये त्या सवयी रूजवाव्या लागतील.

ज्या सवयी मुलांना लावायच्या आहेत, त्या जर तुमच्याच अंगवळणी नसतील तर मुले त्या सवयी कशा फॉलो करणार ? त्यामुळे, चांगल्या सवयी मुलांना लावण्यापूर्वी तुम्ही त्या आधी स्वत:ला लावून घ्या. त्यानंतर मुलांना त्या सवयी लावा. मुलांना या चांगल्या सवयी लावण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स ? चला तर मग जाणून घेऊयात.

आदर आणि संवेदनशीलता

घरातील मोठ्या व्यक्तींचा आणि वडिलांचा आदर करणे ही चांगली सवय मुलांनी पाळावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. ही सवय मुलांना असावी हे पालकांना वाटणे स्वभाविक आहे.

जर तुमची मुले तुम्हाला, तुमच्या वडिलांचा, मोठ्यांचा आदर करताना पाहतील तर मुले सुद्धा याचे आपोआप अनुकरण करतील. फक्त यासाठी मुलांच्या मनात संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मुलांशी संवाद साधावा लागेल, काही गोष्टी शिकवाव्या लागतील.

लवकरात लवकर या गोष्टी शिकवा

मॅनर्स म्हणजेच शिष्टाचार किंवा चांगल्या सवयी होयं. या अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मुलांना जितक्या लवकर शिकवालं तितकं ते मुलांसाठी आणि तुमच्यासाठी चांगल असेलं.

त्यामुळे, कळत्या वयापासून मुलांना गुड मॅनर्स आणि बॅड मॅनर्सबद्दल सांगा. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ज्या योग्य वाटतील त्या सवयी त्यांना लावा.

जसे की, घरातील काही वस्तू घेतल्या तर त्या पुन्हा जागेवर ठेवायच्या. पाहुणे, घरातील किंवा इतर बाहेरील मोठ्या व्यक्तींसोबत आदरपूर्वक बोलणे, इत्यादी गोष्टी तुम्ही मुलांना शिकवू शकता.

शब्दांचा प्रयोग करायला सुरूवात करा

मुलांना गुड मॅनर्स शिकवण्यापूर्वी सर्वात पहिली पायरी म्हणजे मुलांना धन्यवाद (welcome) माफ करा (sorry) या शब्दांचा वापर करायला शिकवणे. यासाठी पालक मुलांसमोर या शब्दांचा प्रयोग करायला सुरूवात करू शकतात.

मुलांसमोर बोलताना पालकांनी या शब्दांचा वापर करायला सुरूवात केल्यावर मुलांच्या कानांवर हे शब्द पडतील. मुलांना त्या शब्दांचे अर्थ आणि महत्व समजावून सांगा. हे शब्द कधी वापरायचे ? हे देखील त्यांना समजावून सांगा. यामुळे मुले हे शब्द लवकर शिकू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT