लाइफस्टाइल

Health Care News : वर्किंग वुमनसाठी या टिप्स आहेत बेस्ट, राहाल फिट अन् हेल्दी

वर्किंग वुमनसाठी या टिप्स आहेत बेस्ट...

Aishwarya Musale

आजच्या काळात महिला केवळ घरच नाही तर बाहेरचे जगही उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. महिलांच्या डोक्यावर एक नाही तर अनेक जबाबदाऱ्या असतात. कुटुंबाची काळजी घेणे, मुलांची काळजी घेणे, करियर करणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे. मात्र या सगळ्यात महिलांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही आणि याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो.

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी निरोगी राहणे हे अधिक कठीण काम आहे. जर तुम्ही एकाच वेळी घर आणि ऑफिस सांभाळत असाल आणि या सगळ्यामध्ये तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढणे तुम्हाला अवघड जात असेल, तर तज्ञांनी दिलेल्या या टिप्स फॉलो करा.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

ऑफीसमध्ये काम करताना महिला अनेकदा कामात अडकून वेळेवर पाणी पिण्यास विसरतात. परंतु शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे. घर आणि ऑफिसच्या कामाच्या दरम्यान 7-8 ग्लास पाणी प्या. तुम्ही दिवसभर डिटॉक्स पाणी किंवा कोमट पाणी देखील पिऊ शकता. त्यामुळे पचनक्रिया सुदृढ राहते आणि शरीर व्यवस्थित कार्य करू शकते.

पोटभर नाश्ता करा

वर्किंग वुमनही अनेकदा ही चूक करतात. घरातील सर्व कामे उरकून, रिकाम्या पोटी ऑफिसला जातात आणि मग लगेच जेवण करतात. पण प्रत्यक्षात त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सकाळी हेवी नाश्ता करा. जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहते आणि तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. प्रथिने युक्त नाश्ता करा.

वॉक करा

ऑफिस आणि घरातील कामामुळे योगासन किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर चालत जा. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा काही तासांनंतर, थोडा वेळ चालत जा. लिफ्टच्या ऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

फळे खा

अनेकदा घर आणि ऑफिस सांभाळताना महिलांना योग्य आहार घेता येत नाही. वर्किंग वुमन ऑफिसमध्ये बराच वेळ घालवतात. अशा परिस्थितीत एखादे फळ सोबत ठेवा. दिवसातून एक हंगामी फळाचा आहारात समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT