Vegan Diet esakal
लाइफस्टाइल

Vegan Diet : वीगन डाएट सुरू केल्यानंतर तुमच्या शरीरात होऊ शकतात ‘हे’ बदल

Vegan Diet : वीगन डाएटमध्ये फक्त आणि फक्त वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो. हे वीगन डाएट फॉलो केल्यानंतर आपल्या शरीरात काही बदल होण्याची शक्यता असते.

Monika Lonkar –Kumbhar

Vegan Diet : आजकाल अनेक जण निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम करतात. काही जण जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात तर काही जण योगा किंवा इतर व्यायाम प्रकारांची मदत घेतात. यासोबतच आहाराची देखील विशेष काळजी घेतली जाते. आजकाल विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स फॉलो केले जातात.

या डाएटपैकी एक असलेले वीगन डाएट अनेक जण फॉलो करतात. वीगन डाएटमध्ये प्राणी किंवा त्यांचा वापर करून बनवण्यात आलेले पदार्थ किंवा उत्पादने खाल्ली जात नाहीत. अनेकांना असे वाटते की, हा शाकाहारी आहाराचा एक प्रकार आहे. मात्र, असे अजिबात नाही.

वीगन डाएटमध्ये फक्त आणि फक्त वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो. हे वीगन डाएट फॉलो केल्यानंतर आपल्या शरीरात काही बदल होण्याची शक्यता असते. हे बदल सकारात्मक किंवा नकारात्मक देखील असू शकतात. आज आपण हे वीगन डाएट सुरू केल्यानंतर शरीरात कोणते बदल होऊ शकतात? याबद्दल जाणून घेणार आहोत. (vegan diet)

वजन कमी होऊ शकते

अनेक जण वजन कमी करण्यासाठी वीगन डाएटचा आधार घेतात. वीगन डाएट चालू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता असते. खास करून जर त्यांनी पूर्वी अतिरिक्त चरबी आणि कॅलरीनेयुक्त असलेले खाद्यपदार्थ खाल्ले असतील तर त्यांच्यामध्ये हा बदल लवकर दिसू शकतो.

कारण, वीगन डाएटमध्ये वनस्पतींवर आधारित असलेला आहार घेतला जातो. या आहारामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी असते आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे, तुमचे वजन कमी होऊ लागते. (Weight loss may occur)

शारिरीक ऊर्जा वाढते

जेव्हा तुम्ही वीगन डाएट चालू करता तेव्हा, सर्वात आधी तुमच्या शारिरीक ऊर्जेच्या पातळीत वाढ झाल्याचा बदल जाणवतो. काही दिवसांमध्येच तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त उत्साही आणि हलके वाटू लागते. हे यामुळे घडते, कारण, आपण आपल्या आहारातून प्रक्रिया केलेले मांस वगळतो आणि त्यांच्याऐवजी आहारात फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करतो. या पदार्थांमध्ये आढळून येणारी जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर्स तुमच्या ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात. (Physical energy increases)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

Latest Marathi News Live Update: रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळला

Horoscope Prediction : 1 फेब्रुवारीला बनतोय रवी पुष्यचा अत्यंत शुभयोग; या पाच राशींना मिळणार भरभरून लाभ

Dhule News : सावधान! मृत किंवा अपात्र सदस्यांची नावे स्वतःहून कमी करा, अन्यथा धुळे जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा इशारा

IND vs NZ, 5th T20I: काळजी करू नका संजू सॅमसन..., टॉस जिंकल्यावर सूर्यकुमारने जाहीर केले प्लेइंग इलेव्हनमधील मोठे बदल

SCROLL FOR NEXT