Huma Qureshi  sakal
लाइफस्टाइल

Huma Qureshi Beauty Tips: हुमा कुरेशीच्या निरोगी त्वचेचे रहस्य आले समोर, सकाळी उठून करते हे काम

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉलीवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला ठसा उमटवला आहे.

Aishwarya Musale

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉलीवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला ठसा उमटवला आहे. हुमा कुरेशी ही ब्यूटी क्वीन आहे. चला तर मग जाणून घेऊया तिचे ब्युटी सिक्रेट.

हुमा कुरेशीने तिचा मॉर्निंग रूटीन शेअर केला आणि सांगितले की ती जेव्हा उठते तेव्हा ती फोन पाहते. मात्र, ही सवय तिला बदलायची आहे असे तिने सांगितले. सध्या अभिनेत्री सकाळी स्वतःसाठी एक तास वेळ काढते. यामध्ये ती कार्डियो करते, वॉक करते, तसेच तिला लिहायलाही आवडते.

हुमाच्या स्किन केअर रूटीनबद्दल बोलायचे झाले तर, ती सकाळी उठून खोबरेल तेल लावते. यामुळे तिच्या त्वचेचा टेक्सचर खूप सुधारला असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. चमकदार आणि गलोविंग स्किनसाठी खोबरेल तेल वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे यात शंका नाही.

हुमा तिच्या चेहऱ्यासाठी साधे फेसवॉश वापरते आणि चेहऱ्यावर कमी उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करते. याशिवाय अभिनेत्री घरात राहूनही सनस्क्रीन लोशन लावते.

सकाळी, हुमा तिच्या चेहऱ्यावरील पफीनेस दूर करण्यासाठी फेशियल मसाज टूल्सचा वापर करते, यामुळे त्वचेचे ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. हुमाच्या नाश्त्यामध्ये ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त स्मूदी असतात, ज्यामध्ये केळी, एवोकॅडो, नट आणि सीड्स असतात.

अशा प्रकारे हुमाचा नाश्ता पूर्णपणे आरोग्यासाठी परिपूर्ण आहे. हुमा तिच्या डेली रूटीनमध्ये नारळ पाणी, लिंबू पाणी आणि कोमट पाणी पिते. यामुळे तिचे चयापचय तर वाढतेच शिवाय त्वचा चमकदारही राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT