funny video of march closing appraisal goes viral on twitter 
लाइफस्टाइल

एप्रिल महिना आला की अशी होते नोकरदारांची अवस्था; पाहा Viral Video 

शर्वरी जोशी

मध्यंतरी 'पावरी हो रही हैं' या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा व्हिडीओ कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला होता. इतकंच नाही तर तो व्हिडीओ पाहून अनेकांनी स्वत: चेदेखील असेच भन्नाट व्हिडीओ तयार केले होते. त्यामुळे एकंदरीतच सोशल मीडियावर असे अनेक नवनवीन ट्रेण्ड व्हायरल होत असतात याचा अंदाज येतो. यातच सध्या काही गायकांचा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर भन्नाट मीम्स तयार केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच व्हिडीओचा एक एप्रिल महिन्यावर आधारित व्हिडीओ नोकरदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.

मार्च महिना संपला की सगळ्या नोकरदारांना पगार वाढीचे म्हणजेच इन्क्रीमेंटचे वेध लागतात. त्यामुळे प्रत्येक नोकरदारामध्ये एप्रिल महिन्यात काम करण्याचा उत्साह असतो. अनेकांना अपेक्षित पगार वाढ मिळते. तर, काहींना मात्र, अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो. त्यामुळे इन्कीमेंट झाल्यावर प्रत्येक नोकरदाराची अवस्था नेमकी कशी असते ते या व्हिडीओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ आयएएस ऑफिसर अवनीश शरण यांनी शेअर केला आहे.

या महिन्याच्या व्हिडीओप्रमाणेच काहींनी भन्नाट मीम्स असणारा व्हिडीओदेखील तयार केला आहे. यात कढईमध्ये उकळत्या तेलात फोडणीचं जिन्नस पडल्यावर त्यांची अवस्था कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, इन्क्रीमेंटवर आधारित व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत असून या व्हिडीओला आतापर्यंत ७८ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, ६५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT