Ideal Lunch Time esakal
लाइफस्टाइल

Ideal Lunch Time : तुम्ही दुपारी किती वाजता जेवतात? ही आहे जेवणाची योग्य वेळ, ऋजुता दिवेकर सांगते...

अनेकदा कामाच्या वेळेत दुपारच्या जेवणाची वेळ चुकते.

धनश्री भावसार-बगाडे

Ideal Lunch Time Tips By Rujuta Diwekar :

बरेच लोक आपल्या कामाच्या व्यापात दुपारच्या जेवणाकडे दूर्लक्ष करतात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेऊया असा पवित्रा घेतात. किंवा काही लोक दुपारच्या जेवणाची वेळ उशिराचीच असते असे गृहित धरून २ ते ४ वाजेदरम्यान जमेल तसे जेवतात.

पण या सवयी आपल्या आरोग्यासाठी घातक असल्याचे प्रसिद्ध डाएटिशीयन ऋजुता दिवेकर सांगतात. त्यांनी नुकतीत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्यानुसार दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती, ती चुकली तर काय परिणाम भोगावे लागतात आणि दरम्यान काय खावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दुपारच्या जेवणाची वेळ चुकली तर काय होते?

  • बऱ्याचदा दुपारी जेवल्यावर सूस्तपणा जाणवतो

  • किंवा जेवणाच्या आधी डलनेस फील होतो.

  • दिवसभर उत्साह जाणवत नाही.

  • डोकं जड होतं किंवा दुखतं.

  • मन एकाग्र होत नाही.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

ऋजुता दिवेकर सांगतात दुपारच्या जेवणासाठी योग्य वेळ ही ११ ते १ वाजे दरम्यानची आहे. यावेळात जेवणे आवश्यक असते. पण आपण अगदी रोजच्या सवयीचा भाग म्हणून ही वेळ लांबवत असतो.

पर्यायी उपाय

पण जर तुम्ही ११ ते १ वाजेदरम्यान जेऊ शकणार नसाल आणि वरील त्रासदायक परिणामांना सामोरे जायचे नसेल तर काही उपाय करणे आवश्यक असते. यावर पर्याय म्हणून ऋजुता दिवेकर खालील उपाय सुचवतात.

  • एक ग्लास पाणी प्या. अगदी सावकाश एक एक घोट घेत.

  • एखादे पल्पी फळ जसे, सिताफळ, चिकू, केळं, पपई असे एखादे फळ खावे.

  • जर फळं नसतील तर खजूर खावे.

  • जेव्हाही दुपारचे जेवण करणार असाल तेव्हा जेवणाच्या शेवटी तूप गुळ खावे.

  • उशिरा जेवल्यावर तूप गुळ खाल्ल्याने अॅसिडीटी, डोकेदुखी, सूस्तपणा जाणवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT