लाइफस्टाइल

Health Care News : हिवाळ्यात गूळ खाण्याचे आहेत भरपूर फायदे... मात्र 'या' गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक! जाणून घ्या

चविष्ट असण्यासोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Aishwarya Musale

गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. चविष्ट असण्यासोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि रिफाइंड साखरेचा एक उत्तम पर्याय देखील आहे. गुळाच्या अगणित फायद्यांमुळे, त्याचा वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

गुळात विविध पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी अँटीऑक्सिडंट असतात. खरे तर प्रत्येक घरात गूळ असणे आवश्यक आहे. साखरेला गुळ हा उत्तम पर्याय असला तरी गुळाचे गुणधर्म समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हीही गुळाचे सेवन करत असाल तर या 3 गोष्टींबद्दल नक्की जाणून घ्या.

1. नेहमी 1 वर्ष जुना गूळ वापरा

नवीन गुळाच्या तुलनेत जुन्या गुळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जुन्या गुळाचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. यकृत आणि स्‍प्‍लीन कंडीशन्‍समध्ये हे फायदेशीर आहे. हे हृदयासाठी चांगले आहे आणि वात संतुलित करते. जुन्या गुळाची चव किंचित खारट आणि रंग किंचित गडद असते.

2. गूळ आणि दूध एकत्र घेऊ नये

गूळ आणि दूध एकत्र घेऊ नये. दूध आणि गुळात विरुद्ध गुणधर्म असतात कारण गूळ गरम असतो तर दूध थंड असते. गूळ फायदेशीर आहे आणि त्यात जीवनसत्त्वे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात, परंतु दुधासोबत त्याचे मिश्रण हानिकारक असू शकते.

3. गुळाची शुद्धता

बाजारात उपलब्ध असलेला हलका रंगाचा गूळ सहसा शुद्ध नसतो हे समजून घेणे आवश्यक आहे. सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यांसारखे पदार्थ गुळाला हलका रंग आणतात. गोल्डन ब्राऊन किंवा गडार्क ब्राउन कलरचा गूळ शुद्ध मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT