Vastu Tips For lord Laxmi Photo Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरी अन् ऑफिसला माता लक्ष्मीचा फोटो लावताना 'या' चुका करू नका

Vastu Tips For lord Laxmi Photo : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचा घरी किंवा ऑफिसमध्ये फोटो लावायचा असेल तर वास्तूनुसार कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For lord Laxmi Photo: वास्तूशास्त्रात घरात सुख-शांती राहण्यासाठी विविध उपाय सांगितले जातात. तसेच माता लक्ष्मीचा फोटो लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे देखील सांगितले आहे. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. मान्यतेनुसार माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास घरातील आर्थिक समस्या कमी होतात. अनेक लोक दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात लावतात. पण वास्तूनुसार माता लक्ष्मीचा फोटो घरात किंवा ऑफिसमध्ये लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

आजकाल बाजारात माता लक्ष्मीचे विविधे फोटो आणि मूर्ती पाहायला मिळतात. आधुनिक युगात टेक्नॉलॉजीचा वापर करून माता लक्ष्मीचे विविध फोटो बाजारात विकायला आले आहेत. बाजारात माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करायला गेल्यावर अनेक लोक गोंधळून जातात. तसेच जी मुर्ती सुंदर आणि आकर्षक दिसते ती खरेदी करतात. जर तुम्ही देखील असे करत असाल तर वेळीच सावध व्हा.कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात.

पुढील चुका करणे टाळाव्यात

वास्तूनुसार घरात माता लक्ष्मी उभी असलेला फोटो कधीच लावू नका. असा फोटो घरात किंवा ऑफिसमध्ये लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तसेच आर्थिक समस्या वाढू शकतात.

घरात किंवा ऑफिसमध्ये माता लक्ष्मी बसलेल्या स्थितीत असलेला फोटो लावावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आर्थिक समस्या दूर होतात.

माता लक्ष्मीचा फोटो ईशान्य कोनात पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.

माता लक्ष्मीची पूजा किंवा आरती करताना तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात साकारात्मक वातावरण राहते.

वास्तूनुसार माता लक्ष्मीचा फोटो चुकूनही अंधार असलेल्या ठिकाणी फोटो लावू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma:'नाही... नाही...' गिल ओरडत राहिला, पण रोहित ऐकला नाही; धावबाद होताच रोहित तापला म्हणाला...

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

BMC Action: 'त्या' कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड! एआय प्रणालीचा वापर, बिलांमधून दंडाची वसुली सुरू

SCROLL FOR NEXT