Immunity Tips: Sakal
लाइफस्टाइल

Immunity Tips: मुलांच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश कल्यास वाढू शकते प्रतिकारशक्ती

Immunity Tips: बदलत्या वातावरणात लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुढील पदार्थांचा समावेश करावा.

Puja Bonkile

Immunity Tips: घरात लहान मुले आहेत त्या प्रत्येक घरात मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. बदलत्या वातावरणात लहान मुले लवकर आजारी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची कमकुवत प्रतिकारशक्ती असते.

अशावेळी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. मुलांना या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलांना खायला दिल्या पाहिजे.

 मुलांना पुढील गोष्टी खायला द्याव्या

दही

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. या सर्व गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. अशा स्थितीत मुलांना रोज दही खायला द्यावे.

मध

मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही त्यांना साधे मध खाण्यास लावू शकता. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

लिंबूवर्गीय फळं

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या मुलांना मोसंबी, लिंबू, संत्री आणि किवी ही फळे खायला देऊ शकता.

अंडी


जर तुमचे मूल अंडी खात असेल तर तुम्ही त्याला हे खाऊ शकता. कारण त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, ओमेगा 3 आणि प्रथिने असतात. मुलांना अंडी देऊन तुम्ही त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT