Independence Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Independence Day 2023: भारतातली अशी राज्यही आहेत जिथे स्वातंत्र्यदिवस साजरा होत नाही, पण का?

राज्यच नाहीतर बंगालमधील काही शहरंही स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत

Pooja Karande-Kadam

Independence Day 2023: सारे जहाँ से अच्छा हिदोस्ता हमारा! असं आज प्रत्येकाच्या ओठी असेल. कारण, आज आहे आपली कर्मभुमी आपली मायभूमी असलेल्या भारत मातेचा स्वातंत्र्यदिन. भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडवणासाठी झटणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येकाचे शौर्य आठवण्याचा दिवस १५ ऑगस्ट. होय याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं.

सगळ्यांनाच वाटतं असेल की आज सगळ्यांनाच सुट्टी असेल. कोणी ऑफिसमध्ये तर कोणी मंडळाच्या ध्वजारोहनात सहभागी होईल. बोलताना आपण म्हणतो की, आज सगळा देश स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण, तसं नाहीय.

देशात अशी काही राज्य आहेत जी आज भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. देशातील अशी तीन राज्य आहेत जी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन करत नाहीत. त्यामागील नक्की कारण काय आहे हे आपण पाहुयात. (Independence Day 2023)

या लिस्टमधील पहिलं राज्य आहे गोवा. तुम्हाला माहितीच आहे की, गोव्यात अनेक वर्ष पोर्तुगिजांनी राज्य केलं होते. आजही गोव्यातील अनेक घराचे बांधकाम,कार्यालये तिथे पोर्तुगिजांच्या पाऊलखूणा दिसतात. गोव्यात पोर्तुगीजांनी जवळ जवळ ४०० वर्षे राज्य केले.

भारत १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य झाला. परंतु भारतातील गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. म्हणून गोव्यात १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा होत नाही. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १४ वर्षानंतर गोव्याला पोर्तुगीजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. १५१० साली अलफान्सो द अल्बकुर्कने गोव्यावर हल्ला केला होता तेव्हापासून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.

ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने पोर्तुगीजांसोबत चर्चा करून गोवा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोर्तुगीजांनी त्याला नकार दिला. गोव्यातून पोर्तुगीज सरकार मसाल्यांचे व्यापार करत होते, हा व्यापार त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर होता. म्हणून त्यांना गोवा सोडायचे नव्हते. (India)

मग गोवा कधी झाला स्वतंत्र्य

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा मुक्तिसंग्राम सुरू झाला. परंतु पोर्तुगीज देश सोडण्यास तयार नव्हते. तसेच भारत सरकार आणि पोर्तुगीज सरकारमधील चर्चा फिसकटत होती. अखेर भारत सरकारने गोवा स्वतंत्र्य करण्यासाठी लष्कर पाठवले आणि युद्धाची तयारी केली. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांकडून स्वतंत्र झाले आणि भारतात विलीन झाले. हा दिवस गोवा मुक्तिसंग्राम म्हणून ओळखला जातो. (Goa)

यातील दुसरं राज्य आहे हैदराबाद

ब्रिटिश काळात हैदाराबाद नावाचे राज्य होते, त्यात मराठवाड्याचाही समावेश होता. या हैदराबात राज्यात निजामांचे राज्य होते. भारताची फाळणी झाल्यानंतर निजामाने दोन्ही देशांच्या संविधान सभेत भाग घेण्यास नकार दिला होता. तसेच भारतात सामील होण्यासही निजामाचा विरोध होता. (Hyderabad)

हैदराबाद राज्यातील जनतेचा कौल भारतात विलीन होण्याकडे होता. हैदराबाद भारतात विलीन होत नसल्याने अखेर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई केली. १३ सप्टेंबर १९४८ साली भारत सरकारने ऑपरेशन पोलो राबवले आणि हैद्राबाद भारतात विलीन करून घेतले. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही एक वर्षांहून अधिक काळ हैद्राबद स्वतंत्र राज्य होते.

तिसरं राज्य आहे भोपाळ

भोपाळ राज्याने आधी भारतात विलीन होण्यास नकार दिला. भोपाळचा नवाब हमीदुल्लाह खान पाकिस्तानात पळून गेले. तसेच भोपाळ पाकिस्तानात सामील व्हावे अशी नवाबांची भूमिका होती. हमीदुल्ला खान हे मोहम्मद अली जिना यांच्या जवळचे होते आणि चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये त्यांचा दबदबा असल्यामुळे अखेर भोपाळ १ मे १९४९ रोजी भारतात विलीन झाले. (Bhopal)

बंगालमधील काही शहरं

संपूर्ण भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो, परंतु, पश्चिम बंगालमधील काही गावांसाठी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी वाट पहावी लागते. कारण, १५ ऑगस्ट, १९४७ रोजी हे जिल्हे स्वतंत्र भारताचा भाग झाले नव्हते. १९४७ मध्ये ऑगस्ट नंतर हे जिल्हे जेव्हा स्वतंत्र भारताचा भाग झाले, तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. (West Bengal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT