Independence Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Independence Day 2024: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुलांनी सहभागी घेतलांय? मग, 'अशा' पद्धतीने वाढवा त्यांचा आत्मविश्वास

Encourage Children for Social Events 78th Independence Day 2024: १५ ऑगस्टला शाळांमध्ये मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Independence Day 2024 : आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते, तेव्हापासून दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी देशातील प्रत्येक शाळेत, सरकारी कार्यालयांमध्ये आणि ऑफिसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शाळांमध्ये देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक, नेते, देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांचे स्मरण केले जाते. त्यांना अभिवादन केले जाते. शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वकृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादविवाद आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये मुले उत्साहाने सहभागी होतात.

परंतु, अनेकदा शाळेत सर्वांसमोर परफॉर्म करताना मुले घाबरतात किंवा अस्वस्थ होतात. हे आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मुलांसोबत घडू शकते. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांना तयारीसाठी मदत केली पाहिजे, जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पालकांनी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा? त्याबद्दलच्या काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहोत.

मुलांचे कौतुक करा

मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळोवेळी त्यांचे कौतुक करा. स्तुती ऐकल्यानंतर, मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे, काहीतरी नवीन आणि चांगले करण्याचा प्रयत्न मुले करतात. जर मुलांना एखादी गोष्ट नाही जमली तर, त्यांच्या चुका दाखण्यापेक्षा त्यांना समजावून सांगत, त्यांचे कौतुक करत, मनोबल वाढवा. परंतु, जास्त प्रमाणात स्तुती करू नका.

क्षमतेनुसार करा तयारी

तुमच्या मुलांची आवड कशात आहे? त्यांची क्षमता कशात आहे? हे लक्षात घेऊनच पालकांनी मुलांची त्याप्रमाणे तयारी करून घ्यावी. मुलांना जे आवडते ते करायला लावा. त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कामे त्यांच्यावर लादू नका. मुलांना ज्यात रस असेल, अशाच कार्यक्रमात त्याला सहभागी व्हायला लावा. त्याप्रमाणे, त्यांची तयारी करून घ्या.

मुलांवर दबाव टाकू नका

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी करताना मुलांवर पालकांनी दबाव टाकू नये. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याला परिपूर्ण करण्यासाठी दबाव आणू नका. त्याच्या क्षमतेनुसार त्याला परफॉर्म करू द्या. त्याप्रमाणे त्याची तयारी करा आणि त्याला मार्गदर्शन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT