Independence Day 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Menstrual Leave: महिला कर्मचाऱ्यांना मिळणार एक दिवसाची मासिक पाळी सुट्टी, स्वातंत्र्यदिनानिमित्त 'या' राज्य सरकारची मोठी घोषणा

Independence Day 2024: ओडिसा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुजा बोनकिले

Independence Day 2024: ओडिशा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची मासिक पाळी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. कटक येथे आयोजित जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेता येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा आहे. उपमुख्यमंत्री प्रवती परिदा म्हणाल्या, "हे ऐच्छिक आहे, ज्या महिला व्यावसायिक कामात गुंतल्या होत्या, त्या शारीरिक वेदनांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. हे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना लागू असेल."

बिहार आणि केरळमध्ये महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुट्टी देण्यात येते

सध्या भारतातील बिहार आणि केरळ राज्यांमध्ये महिलांना मासिक पाळी सुट्टी देण्यात येते.बिहारमध्ये १९९२ पासून राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला दोन दिवसाची सशुल्क मासिक पाळी सुट्टी घेता येते. तर २०२३ मध्ये केरळ सरकारने सरकारी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुट्टी जाहीर केली होती. तसेच 18 वर्षावरील महिला 60 दिवसांपर्यंत प्रसूती रजा दिली आहे.

झोमॅटो सारख्या भारतातील काही खाजगी कंपन्यांनी मासिक पाळी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने 2020 पासून वार्षिक 10 दिवसांची सशुल्क सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT