Independence Day 2025 decoration ideas for schools Sakal
लाइफस्टाइल

Independence Day 2025 : शाळा, संस्था अन् घराची 'अशी' करा सुंदर सजावट अन् स्वातंत्र्यदिन बनवा स्पेशल

Independence Day 2025 Decoration Ideas for Schools: स्वातंत्र्यदिनाला फुगे, तिरंगा यासारख्या गोष्टींचा वापर करून सजावट केल्यास स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दुप्पट करतील.

Puja Bonkile
  1. स्वातंत्र्य दिन 2025 साठी शाळा, संस्था आणि घर तिरंग्याच्या रंगांनी, फुलांनी आणि रांगोळीने सजवा.

  2. राष्ट्रीय ध्वज, देशभक्तीपूर्ण बॅनर्स आणि एलईडी लाइट्स वापरून सजावट आकर्षक बनवा.

  3. मुलांना सजावटीत सहभागी करून देशप्रेमाची भावना जागृत करा आणि उत्सव खास बनवा.

Independence Day Decoration Ideas: दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो. या खास दिनानिमित्त शाळा, घर आणि ऑफिसमध्ये तिरंग्यासह अनेक खास पद्धतीने सजावट केली जाते. स्वातंत्र्यदिनाला पुढील पद्धतींचा वापर करून घर, ऑफिस आणि शाळेला सुंदर सजावट करू शकता.

सुंदर सजावट कशी करावी

कृत्रिम झाड

स्वातंत्र्यदिनाला सजावट करण्यासाठी केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाचं कृत्रिम झाड ऑफिस, शाळा आणि घरात ठेवू शकता. यामुळे ऑफिस डेस्क किंवा घराची शोभा अधिक वाढेल. तुम्ही बाजारात जाऊन किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.

फुग्यांची सजावट

स्वातंत्र्यदिनी तिरंगी फुग्यांचा वापर करून घर, ऑफिस आणि शाळेच्या प्रवेशद्वारावर सजावट करू शकता. यासाठी तुम्ही केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगांच्या फुग्यांचा वापर करू शकता. हे फुगे घर किंवा ऑफिसच्या गेट, हॉलमध्ये लावू शकता. यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वाढेल आणि हा दिवस खास बनेल. सजावटीचा हा एक उत्तम पर्याय आहे.

ओढणीचा वापर

स्वातंत्र्यदिनाला ओढणीचा वापर करून साजवट करू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची ओढणी वापरू शकता. घर किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा भिंतीवर सुंदर सजावट करू शकता. तसेच सपाट ओढणी पांढऱ्या टिकल्या किंवा छोटे काच लावून आकर्षक सजावट करू शकता.

तिरंगा लाइटिंग

स्वातंत्र्यदिनाला खास बनवण्यासाठी लाइटिंगचा देखील वापर करू शकता. रात्रीच्या वेळी तिरंगा रोषनाई करून घर किंवा ऑफिसला आकर्षक सजावट करू शकता. हा सजावटीचा एक उत्तम पर्याय आहे जो सहज करू शकता.

स्वातंत्र्य दिन 2025 साठी सजावट कशी करावी?

तिरंग्याचे रंग, फुले, रांगोळी, बॅनर्स आणि एलईडी लाइट्स वापरून शाळा, संस्था आणि घर सजवा.

स्वातंत्र्य दिनाच्या सजावटीसाठी कोणती सामग्री वापरावी?

राष्ट्रीय ध्वज, कागदी सजावट, फुले, रंगीत कागद आणि देशभक्तीपूर्ण थीम असलेली सामग्री वापरा.


शाळेत स्वातंत्र्य दिनाची सजावट कशी खास बनवावी?

विद्यार्थ्यांना रांगोळी, पोस्टर बनवण्यात सहभागी करा आणि तिरंग्याच्या रंगांनी सभागृह सजवा.

घरात स्वातंत्र्य दिनाची सजावट कशी करावी?

तिरंग्याचे झेंडे, फुलांची सजावट आणि लहान मुलांसह कागदी क्राफ्ट्स बनवून घर सजवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT