How to make tricolor barfi at home Sakal
लाइफस्टाइल

Independence Day Special Recipe: स्वातंत्र्य दिन होईल खास, घरच्या घरी बनवा 'हे' तिरंगी गोड पदार्थ

How to make tricolor barfi at home: हे तिरंगी गोड पदार्थ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना खायला देऊ शकता. हे सर्व पदार्थ बनवणे अगदी सोपे असून चवदार देखील आहेत.

Puja Bonkile

Tri-color sweets recipe for Independence Day 2025:  दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. देशभरातील सर्व लोक एकत्र येऊन हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे प्रत्येक भारतीय 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करतो.

प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्यदिन खास बनवायचा असेल तर घरीच तिरंग्याच्या रंगात गोड पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना खायला देऊ शकता. हे सर्व पदार्थ बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.

laddu

तिरंगा लाडू

स्वातंत्र्यदिनानिमित्त तिंरगी लाडू तयार करू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंगाचे लाडू बनवून एकत्र प्लेटमध्ये सर्व्ह करावे.त्यावर सुकामेवा किंवा पिस्ता टाकून सजावट करू शकता.

barfi

तिरंगा बर्फी

तिरंगा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हा मावा तयार करून तीन वेगळे बाग करायचे आहे. त्या तिन भागांमध्ये खाण्याचा हिरवा आणि केशरी रंग मिक्स करावा आणि एक पांढराच राहू द्या. हे भाग एकत्र करून बर्फी तयार करू शकता.

roll

तिरंगा रोल

तुम्ही घरीच चवदार तिरंगा रोल बनवू शकता. यासाठी खोबऱ्या खिस, साखर आणि खाण्याचा रंगा वापरावा लागेल. हा तिरंगा रोल तयार झाल्यावर त्यावर सिल्व्हर वर्क लावू शकता. हे देखील चांगले दिसेल.

cup cake

स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्याकडे केक बनवायला वेळ नसेल तर कप केक बनवून हा दिवस खास बनवू शकता. कप केक खायला देखील चवदार लागतो आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही आवडीनुसार सुकामेवा टाकून सजावट करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT