diwali 2021 sakal media
लाइफस्टाइल

मलेशिया, युनायटेड किंगडमसह जगातील 'या' 10 देशातही होते 'दिवाळी'

सकाळ वृत्तसेवा

दिवाळी (Diwali) हा दिव्यांचा, आपुलकीचा आणि आनंदाचा सण आहे. हिंदू धर्मानुसार, या दिवशी भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले. आणि अयोध्यावासियांनी संपूर्ण अयोध्यानगर दिव्यांनी सजवले होते. तेव्हा पासून भारतात दिवाळी हा सण साजरा केला जातो. पण केवळ भारतातच नाही तर, जगातील दहा देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पणती, आकाश कंदिल, रंगबेरंगी रंगानी हे दहा देश तेजोमय होवून जातात. सगळे दुःखं, राग विसरून लोक एकमेकांनी भेटतात. भेटवस्तू देतात. दिवाळी सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेतात. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. नेमका कोणत्या देशात हा सण साजरा केला जातो जाणून घेऊया.

फिजी:

फिजीमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याने,येथे दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भारताप्रमाणेच या देशात ही दिवाळीला शाळा, महाविद्यालये तसेच आॅफीस वर्कला सार्वजनिक सुट्टी असते. लोक मोठ्या प्रमाणात पार्टी करतात. एकमेकांना भेटवस्तू देतात.

इंडोनेशिया:

इंडोनेशियामध्ये लोकसंख्या कमी आहे. पण दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. भारतात दिवाळीच्या दिवशी केले जाणारे जवळजवळ सर्व विधी इंडोनेशियामध्येही केले जातात.

मलेशिया:

मलेशियात दिवाळीला हरी दिवाळी म्हणतात. दिवाळीत दिवसाच्या सुरुवातीला लोक तेलाने आंघोळ करून, वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पूजा करतात. मलेशियामध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी असल्याने ते भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छा देऊन आनंद साजरा करतात.

मॉरिशस:

मॉरिशमध्ये पन्नास टक्के लोक हिंदू आहेत. दिवाळी दिवशी याठिकाणी सार्वजनिक सुट्टी असते.

नेपाळ:

नेपाळची सीमा भारताला लागून असल्याने दिवाळीच्या काळात भारतासारखे वातावरण नेपाळमध्ये असते. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हणून ओळखले जाते. नेपाळमधील दशालीनंतर दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतीय प्रथेसारखीच नेपाळमध्येही लक्ष्मीपूजन, घराची लाईटिंगने सजावट, एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.

श्रीलंका:

दिवाळीची नाळ ही श्रीलंकेशीही जोडलेली आहे. श्रीलंकेत हिंदू लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळी हा सण थाटामाटात साजरा केला जातो.

कॅनडा:

कॅनडाला 'मिनी पंजाब' म्हटले जाते. येथे पंजाबी लोक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. कॅनडाच्या संसदेत तिसरी अधिकृत भाषा पंजाबी आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते.

सिंगापूर:

भारता नंतर जर कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होत असेल तर ती म्हणजे सिंगापूर. दिवाळीत येथील सजावट, रांगोळी, देखावा केला जातो. हा एक मोठा उत्सव साजरा केला जातो.

युनायटेड किंगडम:

युकेत भारतीय समुदाय मोठा आहे. येथील बर्मिंगहॅम आणि लीसेस्टर याठिकाणी दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्या पध्दतीने भारतात दिवाळी सेलिब्रेशन होते असेच युकेतही होते.

त्रिनिदाद आणि टोबॅगो:

त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरेबियन बेटावर दिवाळी जल्लोषात सादरी केली जाते. याचबरोबर याठिकाणी रामलीलाही सेलीब्रेशन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

SCROLL FOR NEXT