आवळा Google
लाइफस्टाइल

केस खूप लवकर पांढरे होतायेत? वापरा 'हि' ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

आवळा हा शरीरासाठी खूप फायदेमंद असतो. आवळा योग्य प्रमाणात खाल्ला गेला तर शरीर फिट राहण्यास नक्कीच मदत होते. बऱ्याचदा आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फाॅस्फरस, कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. जे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. याशिवाय मेटाबॉलिक रेट संतुलित ठेवण्यासही मदत करतात. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाचा त्रास असतो त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचा खाण्यात वापर करावा. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक घटकांमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील शांत होतो.आयुर्वेदामध्येही याचे फायदे सांगितले आहेत. बाजारात आवळा पाउडर, आवळा कॅडी, आवळा मुरब्बा आणि आवळ्याचे लोणचे मिळते. आवळ्याविषयी तुम्हाला बरीच माहिती असेल पण आज तुम्हाला आवळ्याच्या पाण्याविषयी सांगणार आहोत.

केसांना आवळ्याचा फायदा

आजकाल केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याची अनेक जरी कारणे असली तरी यातील एक कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. केस पांढरे दिसू नयेत म्हणून अनेकजण बऱ्याच ट्रिक्स वापरतात.वेगवेगळे शाम्पू वापरणे, केस डाय करणे असे प्रयोग केले जातात. तरी ही केस पांढरे दिसतातच. केस पूर्ण काळे होणे अशक्यच असते. पण आवळ्याच्या पाण्याचा वापर करून किमान केस पांढरे होण्यापासून त्याचे रक्षण करू शकता. यासाठी तुम्हाला आता खूप काही वेगळे करण्याची गरज नाही. तुम्ही आवळ्याच्या पाण्याचा वापर करून खूप लवकर पांढऱ्या होणाऱ्या केसांना लगाम लावू शकता. हे वापरत असताना शाम्पू करण्याआधि एक तास केसांना हे पाणी लावा. त्यानंतर केस धुऊन घ्या.

असा करा वापर

जसे केसांना मुळापासून तेल लावले जाते त्याच पध्दतीने हे पाणी लावून घ्या. तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर मेहंदी लावताना यात आवळ्याचे पाणी वापरा. यासाठी मेहंदी भिजवताना त्यात आवळा पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी तुम्हाला ही मेहंदी साॅफ्ट वाटेल. याचा वापर केल्याने काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT