Indira Ekadashi 2024 Sakal
लाइफस्टाइल

Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Indira Ekadashi 2024: पितृपक्षात इंदिरा एकादशी हा पितरांसाठी खास दिवस असतो. यंदा इंदिरा एकादशी कधी साजरी केली जाणार आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

पितृपक्षाला सुरूवात झाली असून 2 ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्षात इंदिरा एकादशी आली आहे. ही एकादशी पितरांसाठी खास असते. वर्षभरात 24 एकादशी असतात. अश्विन महिना सुरू असून या महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.

इंदिरा एकादशीला मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच पितर देखील प्रसन्न होतात. पण यंदा इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर कधी आहे याबाबत गोंधळ असेल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त कधी आहे.

इंदिरा एकादशी कधी आहे?

28 सप्टेंबर 2024 रोजी इंदिरा एकादशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, आश्विन कृष्ण एकादशी तिथी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 01.20 पासून सुरू होईल आणि 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 02.49 वाजेपर्यंत चालू राहील.

कोणते उपाय करावे

इंदिरा एकादशीला दुपारी १२ वाजता पितरांसाठी ध्यान करावे. या दिवशी पितरांसाठी गरुड पुराणाचे पठण करे शुभ मानले जाते. गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांना शांती मिळते अशी मान्यता आहे. इंदिरा एकादशीला गरजूंना अन्न, पैसा, वस्त्रे दान करा, यामुळे माणसाला भौतिक सुख मिळते.

इंदिरा एकादशीचे महत्त्व

इंदिरा एकादशी केल्याने कुटुंबातील 7 पिढ्या एकत्र येतात. कुटुंबात आनंद कायम राहतो.इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते. असे मानले जाते की या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गाचा मार्ग खुला होतो.

शुभ मुहूर्त

इंदिरा एकादशीला सकाळी 07.42 ते 09.12 यावेळी भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी. एकादशीला सकाळी आणि रात्री जागरण करून पूजा केली जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितच

Kolhapur: वाघबीळ मार्गावर हुल्लडबाजी, ४९ दुचाकी जप्त; १८ अल्पवयीन मुलांसह १९ पालकांवर गुन्हा दाखल

Suryakumar Yadav: सूर्या टीम इंडियातून आऊट, पण १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी केली भावुक पोस्ट; काय म्हणाला वाचा ...

Pune: महावितरण कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

'वैभव अजून खूप लहान', टीम इंडियात निवडीनंतर BCCIने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT