International Biological Diversity Day Sakal
लाइफस्टाइल

International Biological Diversity Day: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस का साजरा केला जातो , जाणून घ्या इतिहास अन् महत्व

International Biological Diversity Day: आज जगभरात आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस साजरा केला जात आहे. यंदाची थाम कोणती आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

International Biological Diversity Day 2024: दरवर्षी 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन म्हणून साजरा केला जातो. निसर्ग हे देवाने दिलेली एक देणगी आहे, ज्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची हानी करतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात कारण येत्या काळात आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिनानिमित्त जाणून घेऊया हा दिवस का साजरा केला जातो आणि यंदाची थीम काय आहे.

इतिहास

आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचा इतिहास असा आहे की 1992 मध्ये, पर्यावरण, विकास आणि संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत, राज्य आणि सरकारी नेत्यांनी हा दिवस साजरा करण्याचे मान्य केले होते. हा खास दिवस अस्तित्वात आला आणि 29 डिसेंबर 1993 रोजी नामांकित करण्यात आला. 2001 पासून हा दिवस 22 मे रोजी साजरा केला जाऊ लागला. दरवर्षी हा विशेष दिवस एका अनोख्या थीमने साजरा केला जातो.

कसा साजरा केला जातो?

दरवर्षी जगभरात वेगवेगळ्या प्रकारे आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन साजरा करतात. या दिवशी अनेक राष्ट्रीय सरकारी आणि गैर-सरकारी संस्था देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. अनेक ठिकाणी लोक जैविक विविधतेशी संबंधित पुस्तकांचे वाटप करतात, अनेक शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये या दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात, अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक पर्यावरण विषयावर चित्रपट दाखवतात. या दिवशी बहुतेक लोक जैविक विविधता जतन करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करतात.

या वर्षीची थीम कोणती आहे?

यंदा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाची थीम “बी पार्ट ऑफ द प्लान” ही थीम जैविक विविधतेचे संवर्धन आणि प्रत्येक व्यक्तीचे सामूहिक सहकार्य आणि पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT