India Probable T20I Squad for SL Series: संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशी नवीन ओपनिंग जोडी? श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताच्या संघात उलथापालथ

India probable T20I squad for Sri Lanka series 2026: श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संजू सॅमसनला डच्चू मिळणार? अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी नवी सलामी जोडी बनवणार? पाहा भारताच्या संभाव्य संघातील मोठे बदल आणि महत्त्वाचे अपडेट्स.
India probable T20I squad for Sri Lanka series 2026

India probable T20I squad for Sri Lanka series 2026

esakal

Updated on: 

India vs Sri Lanka T20I squad latest updates: न्यूझीलंड दौरा आटपून ११ दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर श्रीलंकेचा वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत सामना करणार आहे. १३ डिसेंबरपासून वन डे मालिकेला सुरुवात होईल आणि त्यासाठीचा संघ येत्या १-२ दिवसांत बीसीसीआय जाहीर करेल. पण, त्याचवेळी तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळेल, याचीही उत्सुकता आहेच. २२ डिसेंबरला पहिला ट्वेंटी-२० सामना राजकोट येथे खेळवला जाणार आहे आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघात उलथापालथ पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...