International Mother Language Day 2024  esakal
लाइफस्टाइल

International Mother Language Day 2024 : भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात? जाणून घ्या 'या' दिनाचा इतिहास

International Mother Language Day 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी हा दिवस २१ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

International Mother Language Day 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी हा दिवस २१ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाषा हे संवाद साधण्याचे असे एक साधन आहे. जे लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करते. जगातील प्रत्येक देशात अनेक मातृभाषा असू शकतात. एकट्या भारतात अशा २९ प्रमुख भाषा आहेत, ज्या १० लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात.

जगभरात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, पंजाबी, अरबी, जपानी, रशियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश इत्यादी अनेक भाषांचा समावेश आहे. जगातील विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मातृभाषांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २१ फेब्रुवारीला ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा इतिहास

बांगलादेशातील ढाका विद्यापीठात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या भाषिक धोरणाविरोधात जोरदार निदर्शने केली होती. तसेच, आपल्या मातृभाषेच्या अस्तित्वासाठी निषेध व्यक्त केला होता.

ही निदर्शने रोखण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांनी आंदोलकांवर गोळ्या झाडायला सुरूवात केली होती. परंतु, सततच्या निषेधानंतर सरकारला बंगाली भाषेला अधिकृत दर्जा द्यावा लागला. त्यानंतर, युनेस्कोने १९९९ मध्ये भाषिक चळवळीत शहीद झालेल्या तरूणांच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

अगदी तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सर्वात आधी बांगलादेश या देशाने प्रथमच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २००० पासून हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.

भारतात किती भाषा बोलल्या जातात ?

भारत हा देश विविध संस्कृती आणि विविध भाषांनी नटलेला देश आहे. १९६१ च्या एका जनगणनेनुसार भारतात एकूण १६५२ भाषा बोलल्या जातात. दरम्यान, एका अहवालानुसार, सध्या भारतात १३६५ मातृभाषा आहेत, ज्या विविध प्रादेशिक भागांमध्ये बोलल्या जातात. हिंदी ही दुसरी सर्वात लोकप्रिय मातृभाषा आहे. देशातील जवळपास ४३ कोटी लोक हिंदी भाषेत बोलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT