International Picnic Day: Sakal
लाइफस्टाइल

International Picnic Day: पिकनिक दिवस कसा साजरा करावा? वाचा एका क्लिकवर

International Picnic Day 2024: अनेक लोक पिकनिकसाठी केवळ आनंदासाठीच नाही तर त्याचा उल्लेख गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील आहे.

पुजा बोनकिले

International Picnic Day 2024: पिकनिकचे नाव ऐकले की प्रत्येकाला लहानपणीचे जुने दिवस आठवतात जिथे ते शाळेतून पिकनिकला जायचे. ज्यामध्ये सर्व मुले आपल्या शिक्षकांसोबत कुठल्यातरी ठिकाणी फिरण्यासोबतच जेवणाचा आनंद घेत असत. याशिवाय कुटुंबासोबत पिकनिकला जाण्याचीही एक वेगळीच मजा होती. त्यामुळे जीवनातील पिकनिकचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १८ जून रोजी जगभरात जागतिक पिकनिक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अदिक खास बनवण्यसाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

पिकनिक हा शब्द कुठून आला ते जाणून घ्या

पिकनिक या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच भाषेतील 'Pique - Nique' या शब्दापासून तयार झालेला आहे. फ्रेंचमध्ये याचा अर्थ सामाजिक मेळावा, जिथे लोक त्यांच्या खाद्यपदार्थासह एकत्र जमतात. पिकनिकच्या उत्पत्तीबद्दल असे मानले जाते की एकत्र खाणे आणि पिणे ही प्रक्रिया फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सुरू झाली. पिकनिक केवळ आनंदासाठी नाही तर त्याचा उल्लेख गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. ज्यामध्ये पोर्तुगालमध्ये सुमारे 20,000 लोकांनी सहभाग घेतला आणि हा विक्रम केला. असे मानले जाते की 1800 च्या दशकाच्या मध्यात फ्रेंच क्रांतीनंतर या प्रकारचे अनौपचारिक मैदानी जेवण फ्रान्समध्ये एक लोकप्रिय मनोरंजन बनले.

पिकनिला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

पिकनिकला जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची माहिती काढावी.तसेच तेथे जवळपास खाण्याचे दुकान आहेत की नाही याची चौकशी करावी.

तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल तर त्यात लहान मुले आणि वृद्ध लोकांचाही समावेश असेल तर मजा द्विगुणित होते.

जर तुम्हाला पिकनिकला घरून काही पदार्थ बनवून न्यायचे असेल किंवा त्याच ठिकाणी शिजवायचे असेल तर तुम्ही स्वयंपाकाच्या गोष्टी सोबत न्यावे.

मुलांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या आवडीचे रात्रीचे जेवण तयार करा आणि रात्रीचे जेवण कुटुंबासोबत करा.

तुमचे काही जवळचे लोक पिकनिकला येऊ शकत नसले तरीही त्यांना व्हिडिओ कॉल करून बोलू शकता.

पिकनिकवर जेवण बनवण्यासोबतच हा दिवस खास बनवण्यासाठी आणि आठवणीत राहण्यासाठी तुम्ही व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: ठाकरे ब्रँण्डला नागरिकांनी नाकारले आहे- मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT