International Tea Day history of tea esakal
लाइफस्टाइल

इंग्रजांनी एकच गोष्ट चांगली केली; भारतात चहा आणला

सह्याद्रीच्या डोंगर रांगेत जसा रानमेवा पिकतो तशीच चहाची अवस्था आसामच्या जंगलात होती.

सूरज यादव

माझ्यासाठी चहा म्हणजे सोनं असं माझी माय मला सारखं म्हणते... तर अशा या सोन्यासारख्या आवडत्या पेयाचा आज खास दिवस.. आंतरराष्ट्रीय चहा दिन सुरू होऊन 14-15 वर्षे झाली. 2005 पासून 15 डिसेंबरला चहा दिन साजरा करण्यात येत होता. पण आता तो संयुक्त राष्ट्राने 21 मे केलाय. चहा दिन हा चहा पिणाऱ्यांसाठी नाही तर चहांच्या बागेपासून ते चहा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होता. तर दीड दशकाकडे वाटचाल करणाऱ्या या चहा दिवसाचा इतिहास बराच हजारो वर्षे जुना, इसवी सन पूर्वी 30 व्या शतकापर्यंतचा आहे. त्याच्याबाबत रंजक आणि सुरस अशा कथाही सांगितल्या जातात.

खरंतर चहा आपलाच भारतीयांचा आहे (सगळ्या गोष्टीवर हक्क सांगायचा म्हणून) आपल्या आसाम मध्ये तो पिकायचा पण लोकांना माहिती नव्हतं की तो चहा आहे... त्याचे फायदे, तोटे काहीच माहिती नव्हते त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत जसा रानमेवा पिकतो तशीच चहाची अवस्था आसामच्या जंगलात होती. लोकं रानावनातून घरी जाताना थोडी पानं घेऊन यायची आणि ती गरम पाण्यातून प्यायची.. साखर, चव या गोष्टी इंग्रजांनी नंतर भारतीयांसाठी तयार केल्या. तर हा चहा असाममधून पलीकडे चीनमध्येही पोहचलेला. चीनने नेमका गुणधर्म असलेला चहा ओळखला आणि त्याची शेती सुरू केली. इतकी की चहाच्या बाजारपेठेत त्यांचीच मक्तेदारी बनली. हा चहा चीनमधून जपान, इंग्लंड या देशात गेला. चीन एकटाच यात आघाडीवर असल्याने चढ्या भावाने विकण्याचे प्रकार व्हायचे. तेव्हा चहाची तस्करीदेखील सुरू होती.

साधारणत: 15 ते 17 व्या शतकात हे सुरू होतं. त्यानंतर इंग्रजांचे राज्य इतके विस्तारले की त्यांच्या राज्यात सूर्य मावळायचाच नाही. जगात वसाहतींच्या माध्यमातून साम्राज्यविस्तार सुरू होता. व्यापार करताना चोरून चहाच्या बिया त्यांनी भारतात आणल्या आणि त्याचे प्रयोग केले. त्याचवेळी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला आसाममध्ये चहाचा शोध लागला. ही गोष्ट ईस्ट इंडियाच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यांच्या आधीच्या प्रयोगामध्ये या चहाची भर पडली आणि यात यशही आलं. अखेर 1847 मध्ये चहाच्या अधिकृत उत्पादनाला सुरुवात झाली. आज आपल्या देशात उत्पादन होणाऱ्या चहापैकी सर्वाधिक चहा देशातच विकला जातोय.

इंग्रज फक्त चहाचे उत्पादन सुरू करून थांबले नाही. त्यांनी देशात चहाच्या टपऱ्या सुरू केल्या. कारखान्यामध्ये चहा पिण्यासाठी थोडावेळ सुट्टीदेखील दिली जायची. हे सगळं करण्याआधी तो चहा तयार कसा करायचा हेसुद्धा घरी जाऊन शिकवलं. इथपर्यंत झाला भारतातल्या चहाचा इतिहास.

जगातल्या चहाचा इतिहास आणि त्याच्या कथा या खूप रंजक आहेत. त्यातलं सत्य माहिती नाही पण तरीही वाचण्यासारख्या आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि चहाचा शोध हा झाडांमुळे लागलाय. एक होतं सफरचंदाचे आणि दुसरे चहाचे. गुरूत्वाकर्षणवालं सफरचंदाचे झाड हे चहाच्या झाडाच्या तुलनेत फारच अलीकडच्या काळातलं. इसवी सन पूर्व 20 ते 30 व्या शतकात चीनमध्ये चहाचा शोध लागला अशी एक कथा सांगितली जाते. त्यावेळचा सम्राट झाडाखाली बसला होता. सोबत गरम पाण्याचं भांडं होतं. त्यात झाडाची काही पाने पडली. जेव्हा सम्राटाने पाणी पिऊन बघितलं तेव्हा त्याला जी काय तरतरी आली त्यानंतर दररोज ती पाने टाकून पाणी प्यायला लागला हाच तो चहा.

इसवी सन पूर्व सातव्या ते तिसऱ्या शतकात लागवड करण्यापर्यंत चहाचा शोध पोहचला होता. याची शेती सुरू झाली. तेव्हापासून इसवी सन 13 ते 15 व्या शतकापर्यंत चीनने बऱ्याच जाती शोधल्या, त्यात वेगवेगळे प्रयोग केले. चहाचा व्यापार सुरू झाला. यात आणखी एक कथा आहे ती फार मोठी नाही. चीनचाच एक राजा औषध म्हणून दररोज चहाच्या पानांचा काढा प्यायचा. त्यातून हे पेय पुढे जगभर पसरलं असंही म्हणतात. त्यातही राजांचे शौक, त्यांच्याकडे येणारे पाहुणे, व्यापारी यांच्याकडून चहाची माहिती प्रसारीत झाली. व्यापाऱ्यांनी त्यातला व्यवसाय शोधला आणि जगभर पसरवला.. तर शेवटी चिन्यांच्या देशात लागलेला हा शोध कसा का लागेना इंग्रजांनी तो भारतात आणून बरंच काही केलं.... चहाप्रेमींसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT