Darjeeling Tea | First GI Tag Product Of India sakal
लाइफस्टाइल

Darjeeling Tea: चहाचा शॅम्पेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दार्जिलिंग टीला भारतातला पहिला GI टॅग कसा मिळाला? वाचा पूर्ण कहाणी

What Makes Darjeeling Tea Different From Other Indian Teas: भारतातील अनेक प्रसिद्ध चहांपैकी एक, चहाचं शॅम्पेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतातील सर्वात पहिला GI टॅग मिळालेलं उत्पादन असलेल्या दार्जिलिंग चहाबद्दल जाणून घेऊया.

Anushka Tapshalkar

How Darjeeling Tea Became India’s First GI Tagged Product: जगातील अनेक चहाप्रेमी देशांपैकी एक भारत गणला जातो. भारतीयांसाठी चहा एक एनर्जी ड्रिंक आहे. बऱ्यापैकी भारतीयांची दिवासाची सुरुवात एक कप चहानेच होते. भारताला लाभलेली ही संस्कृती केवळ रोजच्या सवयीपुरती मर्यादित नसून ती जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. ऑफिसमध्ये कामाच्या ताणातून ब्रेक हवा असेल, दिवसाचा थकवा घालवायचा असेल, संध्याकाळच्या नाश्त्यासोबत असेल तर अनेकजण चहाला पसंती देतात.

आज म्हणजेच 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. चहाचा इतिहास, संस्कृती आणि आर्थिक महत्त्व यांची जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच निमित्ताने भारतातील अनेक प्रसिद्ध चहांपैकी एक, "चहाचं शॅम्पेन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतातील सर्वात पहिला GI टॅग मिळालेलं उत्पादन असलेल्या दार्जिलिंग चहाबद्दल जाणून घेऊया.

दार्जिलिंग चहा

पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेलं अतिशय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे दार्जिलिंग. समुद्रसपाटीपासून साधारणतः 2000 ते 7000 फूट उंचीवर असलेल्या या प्रदेशात सौम्य आणि आर्द्र हवामान अनुभवायला मिळते. हे हवामान आणि इथली खनिजयुक्त माती चहा उत्पादनासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे इथे चहाचे उत्पादन जास्त प्रमाणात केले जाते.

दार्जिलिंग चहाचा इतिहास

1841 साली एक ब्रिटिश अधिकारी, आर्चिबाल्ड कॅम्पबेल यांनी दार्जिलिंगमधल्या बीचवुड नावाच्या ठिकाणी त्यांच्या बागेत चहाचे काही प्रयोग सुरू केले. हे प्रयोग यशस्वी ठरले आणि काही वर्षातच म्हणजेच 1856 मध्ये ‘टुकवर टी इस्टेट’ नावाची पहिली व्यापारी चहा बाग सुरू झाली.

या बागेनंतर मग हॅपी व्हॅली, कॅसलटन, माकाईबारी अशा बऱ्याच बागा तयार झाल्या आणि सगळ्यांनी मिळून दार्जिलिंग चहाची परंपरा पुढे चालवली.

आजही दार्जिलिंगमध्ये जवळपास 89 चहा बागा आहेत आणि त्या सगळ्या मिळून जगभरात प्रसिद्ध असलेला, “चहाचं शॅम्पेन” म्हणवला जाणारा, दार्जिलिंग चहा तयार करतात.

GI टॅग म्हणजे काय?

GI म्हणजे "Geographical Indication" किंवा भौगोलिक मानांकन. हा टॅग म्हणजे हा एखाद्या विशिष्ट प्रदेशाशी संबंधित असलेल्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचा, गुणवत्तेचा आणि ओळखीचा अधिकृत पुरावा असतो. भारतात 1999 च्या कायद्यानुसार GI नोंदणी केली जाते आणि औद्योगिक प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार विभाग याच्या माध्यमातून अधिकृत GI टॅग दिला जातो.

दार्जिलिंग चहाला मिळालेला GI टॅग म्हणजे केवळ नावाप्रमाणे चहा नव्हे, तर त्या विशिष्ट प्रदेशात तयार झालेला चहा असणे आवश्यक आहे.

या टॅगमुळे स्थानिक उत्पादकांचे हक्क राखले जातात, आणि ग्राहकांनाही खात्री मिळते की आपण जे उत्पादन घेत आहोत ते अस्सल आहे आणि कोणतेही बनावट उत्पादन नाहीये. या टॅगमुळे बनावट उत्पादनांपासून संरक्षण मिळते आणि गुणवत्तेची शाश्वतीही सुनिश्चित होते.

कसा मिळाला GI टॅग?

दार्जिलिंग चहाला 2004 साली भौगोलिक संकेतक (GI) टॅग मिळाला आणि तो असा पहिला भारतीय उत्पादन ठरला. या ओळखीने दार्जिलिंग चहाची खास गुणवत्ता आणि प्रतिष्ठा जपली गेली.

केवळ दार्जिलिंगमध्येच पिकवलेला चहा "दार्जिलिंग टी" म्हणून विकता येईल, हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय चहा मंडळाने 1999 च्या कायद्यानुसार GI साठी अर्ज केला होता, जो कायदा 2003 मध्ये लागू झाला.

या अर्जामागचा उद्देश दार्जिलिंग चहाची खरी ओळख टिकवून ठेवणे आणि बनावट चहापासून त्याच्या नावाला धोका होऊ न देणे हा होता.

दार्जिलिंग चहाचं वैशिष्ट्य

दार्जिलिंग चहा हा त्याच्या विशिष्ट चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक "फ्लश" किंवा हंगामानुसार त्याची चव थोडी बदलत असते. कधी मस्कट द्राक्षांची चव, कधी फुलांचा सुगंध, तर कधी सौम्य सिट्रसी चव.

दार्जिलिंगमध्ये मुख्यत्वे पारंपरिक "ऑर्थोडॉक्स" पद्धतीने चहा तयार केला जातो. "दोन पानं आणि एक कळी" अशी चहा तोडणीची पद्धत इथे आजही काटेकोरपणे पाळली जाते. ही तोडणी मुख्यतः महिला कामगार करत असून, त्यांनी अनेक पिढ्यांपासून ही कला आत्मसात केलेली आहे.

चहा तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध टप्पे असतात. ते म्हणजे वाळवणं, गुंडाळणं, आंबवणं, कोरडं करणं, वर्गवारी आणि पॅकिंग. प्रत्येक टप्पा अत्यंत कौशल्य आणि दक्षतेनं पार पाडला जातो.

दार्जिलिंग चहा ला मिळालेल्या GI टॅगमुळे भारतातील असंख्य पारंपरिक, स्थानिक उत्पादने जपली गेली आहेत. यामुळे केवळ चहा नव्हे, तर अनेक हस्तकला, अन्नप्रकार, वस्त्रप्रकार यांच्या अस्सल उत्पादकतेला संरक्षण मिळालं आहे.

आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने आपण या समृद्ध वारशाचा सन्मान करूया आणि दार्जिलिंग चहासारख्या उत्पादनांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि परंपरा यांना हातभार लावूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT