International Yoga Day 2024 esakal
लाइफस्टाइल

International Yoga Day 2024 : योग शिकण्यासाठी देश-विदेशातील लोक भारतातील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना देतात भेट

International Yoga Day 2024 : भारताने योगाला जगभरात ओळख मिळवून दिली आणि सर्वत्र योगाचा प्रसार केला.

Monika Lonkar –Kumbhar

International Yoga Day 2024 : आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला जात आहे. योगाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जगभरात २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या योग दिनानिमित्त देशभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

योगविद्येचा प्राचीन इतिहास भारताला लाभला असून, नियमित योगा केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

भारताने योगाला जगभरात ओळख मिळवून दिली, योगाचा प्रसार केला. यंदाच्या योगदिनानिमित्त आज आपण भारतातील काही प्रमुख योग केंद्रांबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे परदेशातून ही कित्येक लोक योग शिकण्यासाठी येतात.

ऋषिकेश

उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते. या राज्यातील ऋषिकेश या ठिकाणाला योगाची राजधानी, असे म्हटले जाते. हे ठिकाण हिरव्यागार टेकड्यांनी वेढले असून अनेक योगगुरू आणि ऋषींचे घर देखील आहे.

तुम्ही या ठिकाणी राहून मस्त फिरण्याचा आनंद घेऊ शकता आणि योगाचा सराव देखील करू शकता. विशेष म्हणजे कित्येक परदेशी पर्यटक या ठिकाणी योग शिकण्यासाठी येतात. ऋषीकेशच्या वातावरणात एक सुखद अनुभूती आहे की, जी सर्वांना योग आणि अध्यात्मासाठी प्रेरित करते.

तामिळनाडू

तामिळनाडू राज्यात कोईम्बतूरमध्ये स्थित असलेले ईशा योग केंद्र हे योगासाठी प्रसिद्ध आहे. या केंद्रात येऊन तुम्ही योगासने शिकू शकता. देशातील आणि परदेशातील असंख्य व्यक्ती या ठिकाणी योग शिकण्यासाठी येतात. हे ठिकाण देखील पर्वत आणि हिरवळीने नटलेले आहे. या परिसरात भगवान शिव शंकराची भव्य आदियोगी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ही तुम्ही भेट देऊ शकता.

धर्मशाला

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे ठिकाण पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक भेट देण्यासाठी येतात. हे एक सुंदर हिलस्टेशन असून येथे लोक केवळ फिरायला येत नाह तर, योग शिकण्यासाठी देखील येतात.

विशेष म्हणजे योग आणि ध्यानाशी संबंधित कार्यक्रमांसाठी लोक धर्मशालेला भेट देतात. ध्यान, ध्यानधारणा करण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. योगासोबतच तुम्ही त्रिंड आणि सुंदर कांगडा व्हॅलीमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT