International-Youth-Day 
लाइफस्टाइल

जागतिक चळवळीत सहभागासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन

ऋतुजा कदम

प्रत्येक देशाचे भविष्य हे त्या देशाच्या युवकांच्या हाती असते. आज तयार होणाऱ्या रचनेचे पालन करुन हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते. संयुक्त राष्ट्रांनी जागृती दिन म्हणून स्थापन केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’ मध्ये युवकांच्या आजुबाजुला घडणाऱ्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा हेतू असतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने युवकांशी निगडीत असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर, घटकांवर आणि भविष्यातील आव्हांनावर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षीचे घोषवाक्य ‘जागतिक चळवळींसाठी युवकांचा सहभाग (Youth Engagement for Global Action) असे निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील तरुणांचा सहभाग हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये वाढावा तसेच, युवकांचे प्रतिनिधित्व आणि गुंतवणूक ही संस्थातत्मक राजकाराणासाठी कशी पुढे नेता येईल याचे धडे अशा मुद्दयांवर घोषवाक्य भर देते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युवकांचा स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक संस्थांमध्ये अधिक समावेश करुन जागतिक पातळीवरील आव्हाने साध्य करण्यासाठी त्यांना अधिक सक्षम करणे हा यावर्षीचा मानस आहे. आंततराष्ट्रीय स्थरावर आणि वाढत्या ध्रुवीय जगाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शासन प्रणाली सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीची क्षमता बळकट करण्याची युवकांना पुढाकार घेणे गरजेचे आहे. दहशतवाद, आपत्कालीन परिस्थिती, हवामान बदल आणि असे अनेक मुदद् हेच तरुण पिढीचे लक्ष्य आहे. येणाऱ्या काळ तंत्रज्ञानासोबतच दुप्पट आव्हाने घेऊन येणारा आहे आणि त्याचे पडसाद आतापासूनच पाहायला मिळतात.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे तसेच हवामान बदलांमुळे एकुणच मानवतेला सध्या अनेक आव्हानांना तोंड देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रभावशाली ठोस जागतिक कृती, अर्थपूर्ण गुंतवणूक आणि तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. 

आजची  तरुण पिढी ही ज्ञान, विज्ञाना, तंत्रज्ञान आणि प्रयोगाच्या विश्वात वावरणारा आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. मानवी मुल्ये आणि विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. शिवाय त्याविषयीची मागणी करण्यासाठी ही पिढी सतत सक्रिय असते. युवकांच्या या क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपिठाची जोड देऊन बदल नक्कीच घडवता येईल. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT