Ira Khan Diet esakal
लाइफस्टाइल

Ira Khan Diet : आमिर खानच्या मुलीने केलं २० किलो वजन कमी, पण तिने हे कसं जमवलं ?

हा आहे आयराचा फिटनेस मंत्रा

Pooja Karande-Kadam

Ira Khan Diet :

पुन्हा एकदा हॉस्टेल लाईफ जगायला लावणारा थ्री इडियट फेम अभिनेता आमिर खान एक यशस्वी अभिनेता आहे. आमिरला चाहते मि.परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखतात. जसा तो परफेक्ट आहे अगदी तसेच त्याची मुलगी ही परफेक्ट आहे. आयारा खान नुकतील नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नामुळे मुलगी आयरा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारणही खास आहे.

आजकाल वजन कमी करण्याच्या शर्यतीत अनेक लोक आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक वर्ष वाया घालवणाऱ्या लोकांसाठी आयरा खानने एक नवं उदाहरण घालून दिलं आहे. याचं कारण म्हणजे आयराने चक्क २० किलो वजन कमी केलं आहे. आयराने तिच्या सोशल अकाउंटवर एक फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे की, तिने 20 किलो वजन कमी केले आहे. 

आयरा पेशाने लेखिका, फिल्ममेकर आणि मेंटल हेल्थ ऍडव्होकेट आहे. आयरा मेंटल हेल्थच्या मुद्द्यांप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी तत्पर आहे. आयरा खानने तिचे वजन कसे कमी केलं याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊ. ज्या तुम्हाला तुमच्या डायटमध्ये उपयोगी पडतील. आयरा खानने तिच्या व्यायामात पुल-अप्स, स्ट्रेचिंग आणि एब एक्सरसाइज करते.

आयरा खानने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आधीही काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने स्वत: मेंटल स्ट्रेसचा सामना केला आहे. तसेच, अनेक प्रयत्नानंतर ती डिप्रेशनमधून बाहेर पडली आहे. तिला या कामात मेडिटेशनने मोलाची मदत केली आहे.

त्यामुळे दिवसभरातील काही वेळ ती मेडिटेशन करते. आठवड्यातून एकदा ती जिमनास्टिक खेळते. हृदयाच्या आरोग्यासाठी ती किकबॉक्सिंग करते. यामुळे आपले हृदय सुरक्षित राहते, असे तिचे म्हणणे आहे.

आयराचं डायट कसं आहे

हा झाला आयराच्या व्यायामाचा भाग. पण आयराने २० किलो वजन कमी कसे केले, त्यात महत्त्वाची भूमिका तिच्या डायटची होती. डायटींग केल्याने वजन चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकते. पण यातही काही पदार्थ खाणं बंद केल्याने जास्त इफेक्ट होतो.

आयराने साखर खाणे पूर्णपणे बंद केले आहे. ती गोड खात नाही. तसेच, ती जंकफूड नाहीतर घरीच बनवलेलं अन्न सेवन करणं पसंत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT