Isha Ambani necklace It took three years to find the diamond in anant radhika wedding 
लाइफस्टाइल

Isha Ambani: हौसेला मोल नाही, ईशा अंबानीच्या 'या' नेकलेसमधील हिरे शोधायला लागली तब्बल तीन वर्ष

भावच्या लग्नातील ईशाचा प्रत्येक लुक हा सर्वांना घायाळ करणारा होता. शुभ आशीर्वाद सोहळ्याच्या दिवशीही ईशा हटके लुकमध्ये पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुचर्चित शाही विवाह सोहळा नुकतांच पार पडला. दोघांनीही 12 जुलैला सात फेरे घेतले. पण यांच्या लग्नाची चर्चा काही अजुन थांबलेली दिसत नाही. अशातच अंबानी कुटुंबाची लाडकी मुलगी ईशा अंबानी तिच्या खास एका हारासाठी चर्चेत आली आहे. त्या हाराचे डायमंड (खडे) शोधायला तब्बल 3 वर्ष लागले असल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत राधिकाच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ईशा अंबानीनं. भावच्या लग्नातील ईशाचा प्रत्येक लुक हा सर्वांना घायाळ करणारा होता. शुभ आशीर्वाद सोहळ्याच्या दिवशीही ईशा हटके लुकमध्ये पाहायला मिळाली. पण यावेळी साऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या म्हणजे तिच्या हारावर. कारण तिच्या आऊटफिटसोबत तिचा हारही खुप खास आहे. मिळालेल्या माहितीनुसार हारा मधील डायमंड(खडे) शोधायला तब्बल तीन वर्ष लागले.

अनंत राधिकाच्या शुभ आशीर्वाद समारंभात ईशा अंबानीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पांढरा सिल्क ब्रोकेड लेहेंगा परिधान केला होता. स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अनैता श्रॉफ अदजानिया यांनी या आउटफिटची स्टायलिंग केली आहे. या पांढऱ्या लेहेंग्यात ईशाचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. ईशाच्या लेहेंग्यावर चांदीने वर्क करण्यात आलं होतं.

ईशाने यावेळी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी खास ज्वेलरीदेखील परिधान केली होती. त्यामुळं तिचं सौंदर्य खुपच खुलुन आलं होतं.

ईशाच्या हारासाठी डायमंड शोधायला तीन वर्ष लागलं

ईशा अंबानीचा या नेकलेसला नायब नवरत्न असं म्हणतात. तर अमेरिकेतील प्रसिद्ध सोशल मीडिया प्रभावशाली ज्युलियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नेकलेसमध्ये एक-दोन नव्हे तर 7 रत्न आहेत. ज्युलियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे नेकलेसची माहिती दिली आहे.

लग्नाच्या वेळी नीता अंबानी यांनी स्वतः सांगितले की, ईशाच्या गळ्यात हे रत्न गोळा करण्यासाठी तीन वर्षे लागली. तसेच, ईशाने रुबी, पोल्की डायमंड कानामध्ये परिधान केलं आहेत. दोन्ही कानामध्ये मिस मॅच कानातलं परिधान केलं आहे. कानात पांढऱ्या रंगाची डायमंडची झुमके आणि दुसऱ्या कानात हिरव्या रंगाची झुमके ईशाने कानामध्ये घातले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT