Giorgia Meloni/ Benefits Of Namaste Sakal
लाइफस्टाइल

Benefits Of Namaste: मेलोनींकडून G7 च्या पाहुण्यांचे 'नमस्ते' म्हणत स्वागत, जाणून घ्या नमस्काराचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

Benefits Of Namaste: सोशल मिडियावर 'नमस्ते' मुद्रा व्हायरल होत असून जाणून घेऊया नमस्कार करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे.

Puja Bonkile

Benefits Of Namaste: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जी-७ शिखर संमेलनाच्या पहिल्या दिवशी सर्व पाहुण्यांचे 'नमस्ते' म्हणत स्वागत केले. या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी या कृतीचे कौतुक केले आणि भारताची संस्कृती आणि परंपरा जगभरात पसरवण्यासाठी याचे महत्व अधोरेखित केले आहे. सोशल मिडियावर 'नमस्ते' मुद्रा व्हायरल होत आहे. पण नमस्कार करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे आणि नमस्कार कसा करतात हे जाणून घेऊया.

Benefits Of Namaste:

नमस्काराचा अर्थ

भारतीय संस्कृतीत नमस्कार करण्याला खुप महत्व आहे. देवासमोर किंवा मोठ्या वडीलधारी व्यक्तींसमोर नमस्कार केला जातो. नमस्कार म्हणजे समोरच्या व्यक्तीला आदरभाव व्यक्त करणे.

कसा करताता नमस्कार

नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात जोडावे लागतात. दोन्ही हात समोरासमोर सरळ असावेत. मनात समोरच्या व्यक्तीबद्दल आदर असावा. मस्तक श्रद्धने खाली वाकवावे.

नमस्कार करण्याचे वैज्ञानिक कारण

नमस्कार करताना दोन्ही हात जोडावे लागतात. यामध्ये दोन्ही हाताचे तळवे दाबले जातात. त्यामुळे मेंदु आणि हृदय सक्रिय होतात आणि पुर्वीपेक्षा चांगले काम करू लागतात.

धार्मिक महत्व

नमस्काराचे वैज्ञानिक फायद्याबरोबरच धार्मिक फायदेही आहेत. नमस्कार केल्याने मनात चांगल्या भावना निर्माण होतात. हात जोडल्याने आणि डोके श्रद्धने खाली टेकवल्याने सकारात्मक भावना निर्माण होते. तसेच आपल्या मनात मोठ्यांबद्दल आदराची भावना वाढते. यामुळे आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

हृदय राहते निरोगी

आपल्या हातातील पेशी मेंदूच्या पेशींशी जोडलेल्या असतात. जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हाताचे तळवे जोडतो किंवा दाबतो तेव्हा हृदय चक्र आणि अज्ञ चक्र सक्रिय होऊ लागतात, ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि मन शांत होते. यामुळे तुमचे हृदय मजबूत होते आणि तुमच्या आत असलेली भीती निघून जाते.

प्रेम आणि आपुलकी

नमस्कार करताना तुमचे दोन्ही हात जोडता. हे समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर दर्शवते. यामुळे इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT