Janmashtami  sakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023: जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या लहान मुलांना मनमोहक श्रीकृष्ण बनवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा

अनेक लोक आपल्या मुलांना आणि मुलींना श्रीकृष्ण आणि राधाच्या रूपात तयार करतात. काही जण तर या लूकमध्ये लहान मुलांचे फोटोशूट देखील करतात.

Aishwarya Musale

जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी सर्व घरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जन्माष्टमीची तयारी घराघरात काही दिवस आधीच सुरू होते. या दिवशी 56 प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ तयार करून ठाकूरजींना अर्पण केले जातात.

जन्माष्टमीला लहान मुले आणि मोठ्यांना खूप उत्साह असतो. घरोघरी आणि शाळांमध्ये लहान मुलांना कृष्ण बनवतात. या जन्माष्टमीला या सोप्या टिप्सचे पालन करून तुम्हीही तुमच्या मुलांना कृष्णाप्रमाणे तयार करू शकता.

असे करा तयार

धोती आणि कुर्ता

कान्हाच्या लूकसाठी लहान आकाराचे धोतर आणि कुर्ता बाजारात सहज उपलब्ध होतील. तुम्ही घरच्या घरी धोती-कुर्ताही बनवू शकता. तुम्ही धोती-कुर्ता पिवळा किंवा केशरी रंग निवडू शकता.

मुकुटावर मोराचे पंख

धोती आणि कुर्ता यांच्याशी जुळणाऱ्या रंगात मुलासाठी एक मुकुट बनवा आणि त्यावर मोराची पिसे लावायला विसरू नका.

हार आणि बासरीसह लूक पूर्ण करा

  • श्रीकृष्णाची ओळख म्हणजे त्यांची बासरी. लूक पूर्ण करण्यासाठी हार आणि बासरी आवश्यक आहे.

  • पांढऱ्या मोत्यांच्या माळ लुकला कंप्लिट करते आणि सुंदर दिसते.

तुमच्या मुलाचा मेकअप कान्हासारखा करा

  • लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे कोणताही मेक-अप करण्यापूर्वी बाळाला मॉइश्चरायझर लावा.

  • चेहरा प्रेझेंटेबल करण्यासाठी चेहऱ्यावर फाउंडेशन लावा आणि गालावर गुलाबी ब्लशर लावा.

  • डोळ्यांच्या मेकअपसाठी जाड आयलायनर आणि आयशॅडो लावा.

  • तुम्ही ओठांवर हलकी लाल लिपस्टिक देखील लावू शकता.

  • कपाळावर कुंकू लावून लूक पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

आजींची जय-वीरू जोडी! 87 वर्षांच्या मंदाबेन आणि उषाबेन ‘बाइकर आजी’ म्हणून प्रसिद्ध, viral Video

Pune Accident : पुण्यात शिक्षिकेचा अपघाती मृत्यू, मुख्यमंत्र्यांसाठी ट्रॅफिक वळवल्यामुळे मदत पोहचू शकली नाही ? वसंत मोरेंचा घणाघात

Latest Marathi News Live Update : जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT