Janmashtami 2024 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या या अनोख्या मंदिरात दररोज केली जाते विधीपूर्वक पूजा, पण माचिसचा वापर आहे वर्ज्य, असे का?

केवळ दिवाच नाही तर देवासाठी नैवेद्य चुलीवर बनतो, धूप अगरबत्ती सतत पेटवली जाते. पण यासाठी माचिसचा वापर केला जात नाही. त्यामागे आहे एक इतिहास.

सकाळ डिजिटल टीम

Shri Krishna Temple :

भारताला मंदिरांचा देश म्हणतात. कारण, भारतात अनेक प्राचिन अन् रहस्यमयी पौराणिक मंदिरे आहेत. लवकरच श्री कृष्ण भगवानांचा जन्मदिवस म्हणजे गोकुळाष्टमी साजरी होणार आहे. भगवान श्री कृष्णांची अनेक मंदिरे तुम्ही पाहिली असतील. पण, आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिरांबद्दल सांगणार आहोत त्याला एक विशेष परंपरा आहे.

आपल्या देशात काही मंदिरे अशी आहेत ज्यांना स्वत:हाचा असा इतिहास आहे. या मंदिरात दिवा प्रज्वलित होतो, पण माचिसचा वापर केला जात नाही. केवळ दिवाच नाही तर देवासाठी नैवेद्य चुलीवर बनतो, धूप अगरबत्ती सतत पेटवली जाते. पण यासाठी माचिसचा वापर केला जात नाही. त्यामागे आहे एक इतिहास. (Janmashtami 2024)

वृंदावनमधील श्री राधा रमण मंदिरात हजारो भाविक भेट देतात. हे मंदिर ५०० वर्षांहून अधिक प्राचिन आहे. या मंदिरातील पूजारी पुंडरिक गोस्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ५०० वर्षांपूर्वी इथे श्री राधारमण शाळीग्राम शिळेत प्रकट झाले होते. तेव्हापासून या मंदिरात नित्य सेवा होत आहे.

पुंडरिक गोस्वामी यांनी सांगितले की, जेव्हा इथे राधारमण प्रकटले तेव्हा त्यांच्यासाठी दिप प्रज्वलन करण्यासाठी अग्नीची आवश्यकता होती. तेव्हा चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे इतर शिष्य विचारात पडले. तेव्हा गोपाळ भट्ट यांनी लाकडे एकमेकांवर घासून अग्नीकुंडात अग्नी प्रकट केला. तोच अग्नी आजपर्यंत जपून ठेवण्यात आला आहे.  

श्री राधा रमण मंदिर

त्यावेळी प्रज्वलित केलेला अग्नी आजही या मंदिरात आहे. ज्यामुळे, इथे कोणत्याही कार्यात अग्नी लागणार असेल तर तो या कुंडातून घेतला जातो.  

तसेच, याच अग्नीचा वापर करून त्यावर नैवेद्य आणि प्रसाद बनवले जाते. स्वामी गोपालभट्टांनी सुरू केलेली ही प्रथा आजही त्यांचे अनुयायी या मंदिरात पाळत आहेत.

श्रीकृष्णांची मूर्ती

गोपालभट्ट स्वामीजी हे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते आणि वृंदावनचे हे श्री राधारमण मंदिर चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय पुढे नेत आहे. असे मानले जाते की हजारो वर्षांपूर्वी भगवान कृष्णाचा जन्म झाला तेव्हा राधारमणमधील भगवान कृष्णाची मूर्ती प्रत्यक्षात तशी दिसत होती.

या मंदिरात श्रीकृष्णासोबत राधा राणीची गादी आहे. म्हणजे त्यांची मूर्ती तिथे नाही, पण श्रीकृष्णाजवळ त्यांची जागा बनवली जाते आणि त्या जागेची पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT