Best Home Remedy For Hair Fall Using Onion Juice: सध्या केस गळती ही अनेकांच्या दैनंदिन समस्यांपैकी एक बनली आहे. बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, असंतुलित आहार, अनियमित जेवणाच्या वेळाआणि अपुरी झोप यामुळे शरीराची नैसर्गिक कार्यप्रणाली विस्कळीत होते, ज्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही होतो. याशिवाय हवामानातील बदल, पर्यावरणीय घटक आणि आनुवंशिकता देखील केस गळतीस कारणीभूत ठरतात.
केसांच्या आरोग्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त असल्याचे अनेकांना माहीत आहे, मात्र त्याचा योग्य वापर कसा करावा, हे फार कमी लोकांना ठाऊक असते. प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बाजारातील तेलांच्या तुलनेत कांद्याचा रस अधिक प्रभावी असल्याचे सांगितले. तसेच, हा रस केसांना कसा लावावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. चला, त्यांच्या सल्ल्यानुसार ही पद्धत जाणून घेऊया.
केस गळतीची समस्या उद्भवत असल्यास काय करावे असा प्रश्न विचारला असता जावेद हबीब यांनी फसव्या जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणाऱ्या तेलांपेक्षा कांद्याचा रसच चांगला असे सांगतिले. ते म्हणाले की, " एक कांदा घेऊन त्याचा रस काढा आणि तो तेलासारखा डोक्यावर लावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास लक्षणीय बदल दिसून येतील. विशेषतः कांद्याची साल केसांच्या वाढीस उपयुक्त असल्यामुळे संपूर्ण टाळूवर हा रस चोळा."
जावेद हबीब यांच्या मते, कांद्याचा रस ताजा असतानाच प्रभावी असतो आणि फक्त ५ मिनिटांसाठीच त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळे तो प्रत्येकवेळी ताजा काढून वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त तिखट आणि डोळ्यात लगेच पाणी येईल असा कांदा निवडला तर तो जास्त परिणाम देतो. त्यांच्या मते, हा घरगुती उपाय ९९% लोकांना फायदेशीर ठरू शकतो आणि केस गळती कमी करून त्यांची वाढ होण्यास मदत करू शकतो.
याच मुलाखतीत त्यांनी केसांना तेल लावण्याच्या योग्य पद्धतीबद्दलही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, ओल्या केसांवर तेल लावणे जास्त फायदेशीर असते. केसांना तेल लावण्यापूर्वी आणि नंतर काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
तेल लावण्याची योग्य पद्धत
- केस धुण्याआधी कोमट पाण्याने हलके ओले करावेत – पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसावे.
- त्यानंतर केसांवर तेल व्यवस्थित लावावे.
- काही वेळ मसाज केल्यानंतर केस धुवावेत.
या साध्या पद्धतीचे पालन केल्यास केसांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. जावेद हबीब यांचे हे उपाय नैसर्गिक आणि घरच्या घरी करण्याजोगे असल्यामुळे कोणालाही सहज वापरता येऊ शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.