Juan Vicente Perez Mora Sakal
लाइफस्टाइल

Juan Vicente Perez Mora: जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन; वयाच्या 114व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Juan Vicente Perez Mora: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचा वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले.

Puja Bonkile

juan vicente perez mora world oldest man in the world died age 114

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे राहत्या घरी ताचिरा येथे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले. व्हेनेझुअलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांच्या निधनाची माहिती दिली. जुआन यांना फेब्रुवारी 2022 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यावेळी त्यांचे वय 112 होते.

जुआन यांचा जन्म 27 मे 1909 रोजी व्हेनेझुएला येथे यूक्विटिओ पेरेझ आणि एडेलमिरा मोरा यांच्या घरी झाला होता. सीबीएसच्या अहवालानुसार, त्यांना 11 मुले, 42 नातवंडे, 18 पणतू आहेत.

गव्हर्नर फ्रेडी बर्नाल यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर श्रद्धांजली वाहिली आहे. तर अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित हळहळ व्यक्त केले आहे.

जुआन यांनी वयाच्या 5 व्या वर्षी शेतकाम करण्यास सुरुवात केली होती. ते फक्त काही महिने शाळेत गेले पण ते लिहायला आणि वाचायला शिकले. त्यांनी त्याच्या भागातील जमिनीसंबंधित सोडविण्यास सुरूवात केली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने देखील एक्सवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सीबीएसच्या अहवालानुसार, जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने सांगितले की ते सध्या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती शोधण्यासाठी काम करत आहेत. त्यासाठी दोन दावेदार आहेत - पहिला जपानचा गिसाबुरो सोनोबे, ज्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1911 रोजी झाला आणि दुसरा ब्राझिलियन जोसियास डी ऑलिव्हेरा, ज्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. यांना पदवी प्रदान करण्यापूर्वी दोन्ही जन्मतारीखांची पुष्टी केली पाहिजे असे ग्रुपने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT