Kapalbhati Benefits esakal
लाइफस्टाइल

Kapalbhati Benefits : शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी कपालभाती प्राणायम आहे फायदेशीर, जाणून घ्या करण्याची ‘ही’ योग्य पद्धत

Kapalbhati Benefits : निरोगी आरोग्यासाठी योगा आणि प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे. योगासनांच्या नियमित सरावामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Kapalbhati Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की, शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. योगासनांच्या नियमित सरावामुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

योगासनांमुळे विविध आजारांपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होते. योगासोबतच अनेक जण प्राणायम करण्यावर भर देतात. नियमित प्राणायाम केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच, शिवाय आपली पचनक्रिया देखील सुधारते. कपालभाती प्राणायम केल्याने हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते. तसेच, रक्तपरिसंचरण वाढवण्यासाठी आणि शारिरीक समन्वय सुधारण्यासाठी कपालभाती फायदेशीर मानले जाते. (Kapalbhati Benefits)

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कपालभाती प्राणायामचा नियमित सराव केल्याने किडनी-लिव्हरच्या आरोग्यावर ही चांगला परिणाम होतो. आज आपण हा कपालभाती प्राणायाम कसा करायचा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

कपालभाती प्राणायाम कसा करायचा?

  • कपालभाती प्राणायाम हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

  • लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण हा कपालभाती प्राणायाम करू शकतात.

  • हा प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी पद्मासनात बसा.

  • त्यानंतर, दोन्ही हातांनी ध्यान मुद्रा करा. आता दीर्घश्वास घ्या.

  • हा श्वास घेत असताना तुमचे पोट आतल्या बाजूल खेचा त्यानंतर, हळूहळू श्वास सोडा.

  • सुरूवाताली हा कपालभातीचा प्राणायाम करताना केवळ ५-१० मिनिटे करा.

  • त्यानंतर, तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार सराव वाढवा. (How to do Kapalbhati Pranayam?)

कपालभाती प्राणायाम करण्याचे फायदे कोणते?

पचनक्षमता सुधारते

कपालभातीचा नियमितपणे सराव केल्याने पित्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासोबतच पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या देखील दूर होतात. (improves digestion)

ताण-तणावापासून मिळतो आराम

कपालभातीचा दररोज सराव केल्याने ताण-तणावापासून आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे, जे लोक हे नैराश्याच्या समस्येने त्रस्त आहेत, अशा लोकांनी नियमितपणे कपालभाती प्राणायम करणे फायद्याचे ठरू शकते. (Provides relief from stress)

एकाग्रतेसाठी फायदेशीर

कपालभाती प्राणायमचा नियमितपणे सराव केल्याने तुमच्या मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. त्यामुळे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते. यासोबतच तुमचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहते. (beneficial for concentration)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT